शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

अवैध सावकारीप्रकरणी कारंजात धाडी ; एक कोटीपेक्षा जास्त व्यवहाराचे ६३ स्टॅम्प पेपर जप्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 16:56 IST

वाशिम : अवैध सावकारीसंदर्भात प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने सहकार विभागाने ४ जानेवारीला कारंजा येथे एका अवैध सावकाराच्या घर व प्रतिष्ठावर टाकलेल्या धाडीत १ कोटीपेक्षा जास्त व्यवहाराचे ६३ खरेदी खत, मुद्रांक शुल्क जप्त करण्यात आले. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अवैध सावकारीसंदर्भात प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने सहकार विभागाने ४ जानेवारीला कारंजा येथे एका अवैध सावकाराच्या घर व प्रतिष्ठावर टाकलेल्या धाडीत १ कोटीपेक्षा जास्त व्यवहाराचे ६३ खरेदी खत, मुद्रांक शुल्क जप्त करण्यात आले. कारंजा शहरात अवैध सावकारीचा व्यवसाय केला जात असल्याच्या पृष्ठभूमीवर जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या मार्गदर्शनात आणि जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांच्या योजनेनुसार सहायक निबंधक परेश गुल्हाने यांच्या नेतृत्वात तीन पथकामार्फत कारंजा येथील प्रशांत प्रल्हाद दानेज व प्रल्हाद यादरवसा दानेज यांचे घर व त्यांच्या प्रतिष्ठानावर धाडी टाकण्यात आल्या. यावेळी त्यांच्याकडून अवैध सावकारीचे एकूण ६३ खरेदी खताचे मुद्रांक, सावकारीबाबत डायरी तसेच इतर संशयित दस्तावेज सापडले आहेत. एकूण तीन पथकातील ३५ कर्मचाºयांनी सकाळी १० वाजतापासून सायंकाळपर्यंत धाडसत्र राबवून अवैध दस्तऐवजाच्या नोंदी तसेच इतर संशयास्पद कागदपत्रे हस्तगत करण्यात यश मिळविले. महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम १५ व १६ नुसार सहकाय निबंधकांमार्फत पुढील तपास सुरू असून, तपासाअंती अवैध सावकाराविरूद्ध पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.या पथकात पोलीस विभागाचे कर्मचारी टी.जी. भोयर, एच.पी. चोपडे, राठोड, जी.पी. सिरसाट, एस.जी.नाईक, ए.पी. पत्रे तसेच जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील आर.एल. गडेकर, बनसोडे, जी.बी. राठोड, ए.एम. सारवे, बी.एन. गोदमले, एस.व्ही. राठोड, एस.पी. फुके, के.पी. भुस्कडे, एस.पी. सांगळे, एस.जी. गादेकर, केसरी राठोड, जिल्हा देखरेख संघाचे गटसचिव एस.एस. जाधव, एस.पी. लळे, आर.एस. वानखडे, व्ही.आर. इंगळे, डी.व्ही. हळदे, एच.पी. मोहकार यांचा समावेश होता.

अवैध सावकारी व्यवसायाच्या पार्श्वभूमीवर कारंजा येथील ाील प्रशांत प्रल्हाद दानेज व प्रल्हाद यादरवसा दानेज यांचे घर व त्यांच्या प्रतिष्ठानावर तीन पथकामार्फत धाडी टाकण्यात आल्या. यावेळी त्यांच्याकडून अवैध सावकारीचे एकूण ६३ खरेदी खताचे मुद्रांक, सावकारीबाबत डायरी तसेच इतर संशयित दस्तावेज सापडले आहेत. तपासाअंती पुढील कार्यवाही केली जाणार आहे.-रमेश कटके, जिल्हा उपनिबंधक, वाशिम

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजा