शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श शेती : पार्डीच्या शेतकऱ्याने घेतला रब्बी तुरीचा आधार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 16:31 IST

पार्डी ताड येथील खुशाल गावंडे या शेतकऱ्याने रब्बीच्या हंगामात हरभरा किंवा गहू पिकाची पेरणी करून जोखीम पत्करण्यापेक्षा रब्बी तुरीचा आधार घेतला आहे. दोन एकरात पेरलेली रब्बीची तूर योग्य नियोजनामुळे चांगलीच बहरली आहे.

ठळक मुद्देयोग्य नियोजनामुळे बहरले तुरीचे पीक

लोकमत न्यूज नेटवर्कपार्डी ताड (वाशिम): येथील शेतकरी खुशाल गावंडे यांनी रब्बीच्या हंगामात हरभरा किंवा गहू पिकाची पेरणी करून जोखीम पत्करण्यापेक्षा रब्बी तुरीचा आधार घेतला आहे. दोन एकरात पेरलेली रब्बीची तूर योग्य नियोजनामुळे चांगलीच बहरली असून, या पिकातून १५ क्विंटल उत्पन्न होण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड येथील शेतकरी खुशाल गावंडे  हे आपल्या शेतीत वेगवेगळे प्रयोग करून फेरपालट पद्धतीच्या आधारे भरघोस उत्पादन घेतात. त्यांनी यापूर्वी, गहू, हरभरा, सोयाबीन, उडिद, मुग आणि ज्वारी या पिकांच्या आधारे मोठ्या प्रमाणात उत्पादनही घेतले आहे. त्यांनी मागील वर्षांपासून एक वेगळा प्रयत्न करताना रब्बीच्या तुरीचे उत्पन्न घेण्यास सुरुवात केली आहे. मागील वर्षी त्यांनी अवघ्या २० गुंठे क्षेत्रात रब्बीची तूर पेरली आणि त्यामधून तब्बल ३.७५ क्विंटलचे उत्पादन घेतले. यंदा त्यांनी सोयाबीन आणि उडिद,मुगाची काढणी झाल्यानंतर एकूण शेतापैकी दोन एकर क्षेत्रावर रब्बीची तूर पेरली आहे. यंदा पाऊस कमी झाल्यामुळे गहू पिकाला पाणी देणे शक्य होणार नाही, तर कमी थंडीमुळे हरभरा पिकातून फारसे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा नसल्याने त्यांनी हा प्रयोग केला आहे. हरभरा आणि गहू या दोन्ही पिकापेक्षा रब्बीच्या तुरीला कमी खर्च लागतो. ही बाब लक्षात घेऊन त्यांनी रब्बीची तूर पेरली आहे. तीन फुट अंतरावर ओळीने पेरणी करून तुषार सिंचनाद्वारे तुरीला पाणी दिले. खत आणि किटकनाशकांचा प्रभावी वापर करून त्यांनी ही तुर वाढविली आहे. सद्यस्थितीत ही तूर तीन फुट उंच वाढली असून, या पिकातून किमान १५ क्विंटल उत्पन्न मिळण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी