शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

प्रायोगिक तत्त्वावर पाचवा वर्ग ऑलाईन करण्याचा विचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 17:19 IST

पाचवा वर्ग प्रायोगिक तत्त्वावर ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्याबाबत चर्चा झाली; परंतु त्यावर अंतीम निर्णय झालेला नाही.

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम : यंदाच्या शैक्षणिक सत्राबाबत शासनाकडून अद्यापही कोणताच ठाम निर्णय घेण्यात आला नाही. काही खासगी शाळांनी ऑनलाईन पद्धतीने शैक्षणिक सत्राला सुरुवात केली असली तरी, त्याचाही फारसा फायदा होत नसल्याचे दिसत आहे. तीन दिवसांपूर्वी अमरावती येथे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अमरावती विभागातील स्थितीचा आढावा घेतला. यावेळी पाचवा वर्ग प्रायोगिक तत्त्वावर ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्याबाबत चर्चा झाली; परंतु त्यावर अंतीम निर्णय झालेला नाही.कोरोना विषाणू संसर्गामुळे राज्यात अद्यापही यंदाच्या शैक्षणिक सत्राला सुरुवात झालेली नाही. राज्यशासनाकडून याबाबत अद्याप कोणताही ठाम निर्णय घेण्यात आला नाही. त्यातच शाळा सुरू करण्याचे सर्व अधिकार जिल्हाधिकारी, ग्रामपंचायत आणि स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीला दिल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. तथापि, अमरावती विभागातील कोणत्याही जिल्ह्यात जिल्हाधिकारी अथवा ग्रामपंचायतींसह स्थानिक शाळा व्यवस्थापन समित्यांकडूनही याबाबत कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे शासकीय शाळांतूनही कोणत्याच हालचाली नाहीत. काही खासगी शाळांनी आॅनलाईन वर्ग सुरू केले आहेत. त्यातही अनेक पालकांची स्मार्ट फोन घेण्याची ऐपत नाही. शिवाय या ऑनलाईन पद्धतीत विद्यार्थी अभ्यासात एकाग्र होत नसल्याचेही दिसत आहे. त्यामुळे पालकवर्गात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. तीन दिवसांपूर्वी शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी तीन दिवसांपूर्वी अमरावती येथे विभागातील शैक्षणिक सत्राची तयारी व इतर उपाय योजनांचा आढावा घेतला. त्यात शासकीय शाळांत पाचवा वर्ग ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्याबाबत चर्चा झाली. तथापि, त्यावरही अंतीम निर्णय झालेला नाही. नेमका हा वर्ग कसा सुरू करणार, विद्यार्थ्यांच्या स्मार्ट फोनच्या अडचणी कशा सोडविणार, आदिविषयी काहीही ठरलेले नाही.

शालेय शिक्षण राज्यमंत्र्यांनी तीन दिवसांपूर्वी विभागातील यंदाच्या शैक्षणिक सत्राबाबतच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी विविध विषयावर चर्चा झाली आणि त्यांनी काही सुचनाही केल्या. या सभेत प्रायोगिक तत्त्वावर पाचवा वर्ग आॅनलाईन पद्धतीने सुरू करण्याबाबत चर्चा झाली; परंतु कोणताही अंतीम निर्णय होऊ शकला नाही.-गजाननराव डाबेरावप्रभारी, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक)जि.प. वाशिम:

टॅग्स :washimवाशिमEducation Sectorशिक्षण क्षेत्र