शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

बर्फगोला ठरतोय आजारांना कारणीभूत ;  सॅक्रिन मिश्रीत रंग आरोग्यासाठी घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 13:21 IST

. बर्फ गोला व सरबतासाठी वापरण्यात येणारे रंगही दर्जाहीन आणि पाणीही अशुद्ध असल्याने गॅस्ट्रो आणि कावीळच्या साथीचा प्रादुर्भाव वाढण्याची भिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देकाला खट्टा, आॅरेंज, रेड, चॉकलेटी, हिरवा, पिवळया रंगाच्या आकर्षक दिसणाऱ्या या बाटलीतील साखरीन मिश्रीत रंग आरोग्यासाठी घातक ठरत आहे. जिल्हाभरात खेडयापाडयांसह शहरांमध्ये शेकडो बर्फ गोले विक्रेता असून त्यापैकी किती जण स्वच्छतेकडे लक्ष देतात याचा अंदाज घेणे अवघड आहे.बर्फ गोला खाण्याआधी नागरिकांनी बर्फ कोठे तयार होतो, त्यासाठी कुठले पाणी वापरतात याची शहानिशा करणे गरजेचे आहे. 

वाशिम :   तापत्या उन्हात लोकांना रस्त्याच्या कडेला लागलेल्या गाडीवरचा बर्फ गोला खाण्याचा मोह आवरत नाही. उन्हाचा पारा चढत असल्याने फळांचा रस, लिंबू सरबतच्या गाड्यांवर नागरिकांची गर्दी वाढत आहे. बर्फ गोला व सरबतासाठी वापरण्यात येणारे रंग कोणत्या दर्जाचे असतात, यावर आरोग्याचा प्रश्न अवलंबून आहे. रंगही दर्जाहीन आणि पाणीही अशुद्ध असल्याने गॅस्ट्रो आणि कावीळच्या साथीचा प्रादुर्भाव वाढण्याची भिती निर्माण झाली आहे. काला खट्टा, आॅरेंज, रेड, चॉकलेटी, हिरवा, पिवळया रंगाच्या आकर्षक दिसणाऱ्या या बाटलीतील साखरीन मिश्रीत रंग आरोग्यासाठी घातक ठरत आहे.

रस्त्यावर, रेल्वेस्थानक परिसर आणि बसस्थानक परिसर, मुख्य चौक तसेच कॉलनीतील गल्लोगल्ली  हे बर्फाचे गोले विकणाऱ्यांची दिवसभर ये-जा सुरुच असते. बच्च कंपनी बर्फ गोला खाण्यासाठी हट्ट  करतात काही जण कौतुकाने मुलांना हे गोले खायला देतात. गोल्यातील रंग बघून अनेकांना बर्फाचा गोळा खाण्याची इच्छा होते. मात्र हा बर्फाचा गोलाच अनेक आजाराला कारणीभुत ठरत आहे. उन्हाळ्यात उदरनिर्वाहाचे साधन म्हणून काही गरीब व होतकरू विक्रेत्यांनी बर्फ गोला व्यवसाय सुरू केला असेल. काहींचे घरच या सरबतच्या गाड्या आणि बर्फाच्या गोळयावर चालतही असेल. मात्र, आरोग्याच्या दृष्टिने विचार केला तर सावधानता बाळगणे गरजेचे ठरत आहे. अनेकांना शुद्ध पाणी परवडत नसल्याने, ‘मिळेल त्या पाण्याचे’ सरबत बनविण्याचा हा पर्याय अनेकांनी निवडलाही असेल. हा पर्याय मात्र सरबत पिणाऱ्यांचे आरोग्य धोक्यात टाकत आहे. वाशिम जिल्हाभरात खेडयापाडयांसह शहरांमध्ये शेकडो बर्फ गोले विक्रेता असून त्यापैकी किती जण स्वच्छतेकडे लक्ष देतात याचा अंदाज घेणे अवघड आहे. त्यामुळे बर्फ गोला खाण्याआधी नागरिकांनी बर्फ कोठे तयार होतो, त्यासाठी कुठले पाणी वापरतात याची शहानिशा करणे गरजेचे आहे. 

असा बनतो बर्फ गोळा, सरबत

गाड्यावरील सरबत बहुतांशी अस्वच्छतेच्या वातावरणात बनविले जाते. ते बनविताना स्वच्छतेची पूर्णपणे काळजी घेतली जाते की नाही, हा प्रश्न अनुत्तरीय आहे. अनेक वेळा दुषित पाणी, निकृष्ट दर्जाच्या रंगांचाही वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गोळा बनविण्यासाठी वापरण्यात येणारा बर्फ बारदान्यात गुंडाळून ठेवण्यात येतो. बर्फ बनविण्यात येणाºया कारखान्यातही विशेष अशी काळजी घेतली जात नाही. बर्फ बनविण्यासाठी कारखान्यात मोठमोठे फ्रिजर असतात मात्र त्या फ्रिजरच्यावर लाकडी पाट्या ठेवण्यात येतात. व त्यावरुनच कारखान्यातील कामगार ये-जा करताना दिसून येतात. त्यामुळे कामगाराच्या पायांची धुळ अथवा घाण बर्फात मिसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र या बाबीकडेही संबंधितांचे सपशेल दुर्लक्ष होत आहे.

बर्फगोला आरोग्यास अतिशय धोकादायक असून अतिसेवनाने घश्याचा त्रास उदभवतो. लहान बालकांमध्ये याची मोठया प्रमाणात ओढ असते. पालकांनी याकडे लक्ष देवून बालकांना बर्फगोला देण्याचे टाळणे गरजचे आहे. तसेच यामध्ये वापरण्यात येत असलेला रंग सुध्दा आरोग्यास हानी पोहचविणार आहे.

- डॉ. अनिल कावरखे,वैद्यकीय अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय , वाशिम

टॅग्स :washimवाशिमHealthआरोग्य