शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हा कोविड रुग्णालयात स्वच्छतेचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 20:14 IST

Washim News : बेडजवळ असलेल्या कचराकुंडीत केरकचरा व अन्य टाकाऊ साहित्य पडून असल्याचे या चित्रिकरणात दिसून येत आहे.

ठळक मुद्देरुग्णांना मनस्ताप समाज माध्यमांमध्ये चित्रिकरण व्हायरल

वाशिम : जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरातील सरकारी जिल्हा कोविड रुग्णालयात स्वच्छतेचा बोजवारा उडत असल्याने रुग्णांना कोरोनाबरोबरच मनस्तापही सहन करावा लागत असल्याचा प्रकार २० मे रोजी समोर आला. यासंदर्भातील चित्रिकरण व छायाचित्र हे समाज माध्यमांमध्ये ‘व्हायरल’ झाले असून, स्वच्छतेसंदर्भात आरोग्य विभागासह प्रशासन कोणते पाऊल उचलते याकडे रुग्णांसह नातेवाईकांचे लक्ष लागून आहे.दुसºया लाटेत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने कोविड केअर सेंटर, कोविड रुग्णालय यासह खासगी कोविड हॉस्पिटलला मंजूरी देण्यात येत आहे. वाशिम येथे जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरात जिल्हा कोविड रुग्णालय असून, येथे आॅक्सिजनसह व्हेंटिलेटर बेडची सुविधा उपलब्ध आहे. मध्यम व गंभीर स्वरुपाची लक्षणे असणाºया रुग्णांना येथे उपचारार्थ दाखल केले आहे. दरम्यान येथे नियमित स्वच्छता होत नसल्याचा आरोप रुग्ण व नातेवाईकांमधून केला जात आहे. २० मे रोजी यासंदर्भात छायाचित्र व चित्रिकरण हे समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाले आहे. बेडजवळ असलेल्या कचराकुंडीत केरकचरा व अन्य टाकाऊ साहित्य पडून असल्याचे या चित्रिकरणात दिसून येत असून, याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही करण्यात आला. शौचालयाची सफाईदेखील नियमित होत नसून, यामुळे रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागत असल्यासंदर्भातील आॅडिओ क्लिपही व्हायरल झाल्या आहेत. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देण्याची मागणी रुग्ण व नातेवाईकांमधून होत आहे. जिल्हा कोविड रुग्णालयातील स्वच्छता, साफसफाई नियमित केली जात आहे. आज संबंधित सफाई कामगाराकडून सकाळच्या सुमारास थोडा विलंब झाला होता. यासंदर्भातील माहिती मिळताच तातडीने स्वच्छता व साफसफाई करण्यात आली. स्वच्छतेसंदर्भात दिरंगाई करू नये, अशा सूचना संबंधितांना देण्यात आल्या.- डॉ. मधुकर राठोडजिल्हा शल्य चिकित्सक  जिल्हा कोविड रुग्णालयातील एका रुग्णाच्या नातेवाईकाने आपल्याशी मोबाईलवर संपर्क साधून अस्वच्छतेसंदर्भात व्यथा मांडल्या. सोबतच छायाचित्र व व्हिडिओदेखील पाठविले. या प्रकाराची माहिती संबंधितांना देण्यात आली. नियमित स्वच्छता करून रुग्णांना चांगल्या सुविधा मिळाव्या, अशी अपेक्षा आहे.- मनिष मंत्रीजिल्हा सचिवव्यापारी मंडळ, वाशिम

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या