शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी पतीस सश्रम कारावास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 11:00 IST

Washim Crime News पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा येथील तदर्थ जिल्हा न्यायाधीश डॉ. रचना तेहरा यांनी ११ डिसेंबर रोजी सुनावली.

ठळक मुद्देस्मिता ही मोप येथे परिचारिका होती.गजानन हा नेहमी तिच्या चारित्र्यावर संशय घेता होता.या त्रासाला कंटाळून स्मिताने आत्महत्या केली.

 लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गजानन हिंमत कंकाळ (रा. मोप. ता. रिसोड) या आरोपी पतीस पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा येथील तदर्थ जिल्हा न्यायाधीश डॉ. रचना तेहरा यांनी ११ डिसेंबर रोजी सुनावली.बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील शिवनी जाट येथील रहिवासी सेवानिवृत्त शिक्षक परसराम भिकाजी सुर्वे यांनी १ फेब्रुवारी २०१६ रोजी या घटनेची फिर्याद रिसोड पोलीस स्टेशनला दिली होती. परसराम सुर्वे यांची मुलगी स्मिता हिचा विवाह मोप येथील गजानन हिंमत कंकाळ याच्याशी झाला होता. स्मिता ही मोप येथे परिचारिका होती. गजानन हा नेहमी तिच्या चारित्र्यावर संशय घेता होता. यातूनच तो तिला नेहमी शारीरिक व मानसिक त्रास द्यायचा. या त्रासाला कंटाळून स्मिताने आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येस पतीसह सासरची मंडळी जबाबदार असल्याचे परसराम सुर्वे यांनी फिर्यादीत म्हटले होते. याप्रकरणी रिसोड पोलिसांनी आरोपी पती गजानन कंकाळ, सासरा हिंमत रायभान कंकाळ व भाया विजय हिंमत कंकाळ यांच्या विरुद्ध कलम ४९८ अ,३०६ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले होते. या प्रकरणात एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षी पुराव्यावरून दोषी आढळून आल्याने आरोपी पती गजानन कंकाळ यास भादंवि कलम ४९८ अ मध्ये दोन वर्षे सश्रम कारावास तसेच एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने सश्रम कारावास तसेच भादंवि कलम ३०६ मध्ये पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा तसेच दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास पुन्हा तीन महिने सश्रम कारावासाची शिक्षा तदर्थ जिल्हा न्यायाधीश डॉ. रचना तेहरा यांनी ठोठावली. आरोपीस या दोन्ही शिक्षा एकत्र भोगावयाच्या आहेत. अन्य आरोपींना सबळ पुराव्याअभावी निर्दोष सोडण्यात आले आहे. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता माधुरी मिसर यांनी तसेच कोर्ट पैरवी म्हणून अमर ठाकूर यांनी काम पाहिले. 

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारी