शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

शाळांमध्ये आधार अपलोड करण्याची लगीनघाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 16:41 IST

आता शाळांमध्ये आधार अपलोड करण्याची लगीनघाई सुरू असून त्यामुळे मुख्याध्यापक, शिक्षकांची जबाबदारी वाढली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम) : शाळांमधील विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अपडेट करणे अत्यावश्यक असून, २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात ‘स्टुडंट पोर्टल’वर आधार विषयक नोंद केलेल्या विद्यार्थ्यांची संख्याच संच मान्यता करताना विचारात घेतली जाणार आहे. परिणामी, आता शाळांमध्ये आधार अपलोड करण्याची लगीनघाई सुरू असून त्यामुळे मुख्याध्यापक, शिक्षकांची जबाबदारी वाढली आहे.राज्यातील प्राथमिक ते माध्यमिक शाळांच्या संच मान्यतेची प्रक्रिया, ‘एनआयसी’मार्फत जिल्हास्तरावर शिक्षणाधिकाºयांमार्फत होत असते. या अनुषंगाने राज्याच्या शिक्षण विभागाने २०१९ -२० मध्ये स्टुडंट पोर्टलवर विद्यार्थी विषयक माहितीची नोंद करताना आधार क्रमांकाची नोंद करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. असे असले तरी अनेक शाळांनी विद्यार्थी किंवा त्यांच्या पालकांकडे आधार कार्ड असतानाही त्यांचे आधार क्रमांक अपडेट केले नसल्याची बाब समोर आली. त्यामुळे आता या विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अपडेट करणे आणि ज्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नाही, त्या विद्यार्थ्यांकडून  आधार कार्ड उपलब्ध करुन घेणे, याबाबतचे आदेश शिक्षण विभागाने २० मे रोजी दिले. उन्हाळी सुट्यांमध्ये हे काम करावे तसेच सुट्या, लॉकडाऊन संपल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नाही, त्यांचे आधार कार्ड काढण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना आहेत. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात शाळांच्या संच मान्यतेसाठी ज्या विद्यार्थ्यांची  आधारविषयक माहिती स्टुंडट पोर्टलवर नोंद केलेली असेल, अशा विद्यार्थ्यांची संख्याच संच मान्यतेसाठी ग्राह्य धरली जाणार आहे. त्यामुळे गटशिक्षणाधिकाºयांनी तालुक्यातील आधारकार्ड काढलेल्या विद्यार्थ्यांच्या स्टुडंट पोर्टलवरील माहितीच्या आधारे आढावा घ्यावा व आधारकार्ड काढणाºया यंत्रणेच्या तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय समन्वयक यांच्याशी संपर्क साधून सर्वच विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढले जातील, याची दक्षता घ्यावी, असेही आदेशात नमूद आहे .

टॅग्स :washimवाशिमEducation Sectorशिक्षण क्षेत्रAdhar Cardआधार कार्ड