शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

उन्हाळ्यात चिमुकल्यांनी बनविले शेकडो ‘सिड्सबाॅल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:29 IST

जमिनीतली पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत असून तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. एवढेच नव्हे तर रस्ते नवनिर्मितीच्या कामामुळे लाखो ...

जमिनीतली पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत असून तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. एवढेच नव्हे तर रस्ते नवनिर्मितीच्या कामामुळे लाखो वृक्षाची कटाई करण्यात आली. यामुळे जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यावर एकमेव उपाय म्हणजे झाडे लावणे. याकरिता बिजांचे गोळे तयार करून ते आसपासच्या परिसरात फेकले तर आनंद, मजा आणि पिकनिकही होईल आणि धरतीही फळफळेल सोबतचसारख्या मोबाइलच्या अतिवापराच्या दुनियेतून चिमुकली मातीशी पर्यायाने पर्यावरणाशी जोडली जातील या हेतूने संपूर्ण नकोश्या असलेल्या उन्हाळ्यात सदुपयोग व्हावा यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात चिमुकल्यांनी प्रत्येकी शंभर बीजगोळे म्हणजे 'सीडबॉल्स' तयार केले असून पावसाळा सुरू होताच वनहद्दीत सिड्सबाॅल राजरत्न संस्थेकडून फेकले जाणार आहेत. वैशाली खोब्रागडे-मेश्राम यांनी चिमुकल्यांना सिड्सबाॅल प्रशिक्षण देऊन सातत्याने बीजबाॅल निर्मिती करून घेतली. ज्यामध्ये चंदन, निंब, वड, पिंपळ, आंबा या सारख्या देशी वृक्षाचा समावेश आहे. परदेशी वृक्षावर आपल्याकडील पक्षी बसत नसल्याने व ते वृक्ष येथील मातीस पोषक नसल्याने देशी वृक्षलागवड, जतन संवर्धनावर पर्यावरणवाद्यानी भर द्यावा, असे आवाहन यावेळी वैशाली खोब्रागडे-मेश्राम यांनी केले.

वाशिम आसपासच्या पाण्याचे स्त्रोत असलेल्या ओसाड जमिनीवर देशी सिड्स बाॅल फेकण्यात येणार आहेत. मातीशी मनमुराद खेळत लाॅकडाऊनचा फायदा घेत घरात राहून चिमुकल्यांनी तब्बल पाचशे बीजबाॅलची निर्मिती केली. यामध्ये विधी मेश्राम, आरती नागूलकर, श्रेयस काळबांडे, ज्ञानेश्वरी नागूलकर या चिमुकल्यांचा समावेश होता.

..............

अशी झाली सिड्स बीजनिर्मिती

‘सीडबॉल्स’ तयार करण्यासाठी माती, शेण, खत व देशी बियाणे वापरले गेले. एक दिवस आधी बियाण्यांना धुवून त्यांना स्वच्छ पुसले गेले. कोरडे करून त्याला खत व शेणाच्या मिश्रणात मिसळून त्याचे गोळे चिमुकल्यांनी तयार केले. ‘सीडबॉल’मध्ये पोषक मूल्ये असल्यामुळे जमिनीत रुजेपर्यंत ते तग धरू शकतील यामधून उगवलेले अंकुर भविष्यात महाकाय वृक्षात परिवर्तीत होऊन पर्यावरण अबाधित राखण्यासाठी मदत होईल.