शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

निराधार मूकबधिराना शिक्षणाबरोबर दिली मायेची उब; कोकाटे दाम्पत्यांचा अनोखा उपक्रम​​​​​​​

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 14:47 IST

रिसोड :  रिसोड  तालुक्यातील मोरगव्हाण येथिल डॉ. प्रल्हाद कोकाटे व त्यांची पत्नी त्रिवेणी कोकाटे यांनी परिसरातील मूकबधिर व आई वडिलांचे छत्र हरविलेल्या निराधार मुलांना दर्जेदार शिक्षणसोबतच मायेची उब देण्याचे उपक्रम हाती घेतला आहे.

ठळक मुद्देश्री. संत गजानन महाराज निवासी मूकबधिर विद्यालय सुरू केले. निराधार, अपंग मुलांना शिक्षणबरोबर सर्व भौतिक सोयी, सुविधा येथे उपलब्ध करुन दिल्यात.या शाळेत आजमितीस चाळीस मूकबधिर मुले शिक्षण घेत आहेत. त्रिवेणी कोकाटे ह्या आईप्रमाणेच मुलांच्या सकाळच्या आंघोळी पासून तर रात्री झोपेपर्यंत काळजी घेतात.

- शीतल धांडे

रिसोड :  रिसोड  तालुक्यातील मोरगव्हाण येथिल डॉ. प्रल्हाद कोकाटे व त्यांची पत्नी त्रिवेणी कोकाटे यांनी परिसरातील मूकबधिर व आई वडिलांचे छत्र हरविलेल्या निराधार मुलांना दर्जेदार शिक्षणसोबतच मायेची उब देण्याचे उपक्रम हाती घेतला आहे. विशेष म्हणजे  यासाठी त्यांनी नोकरी सोडून या कार्यामध्ये स्व:ताला  झोकून दिले आहे. हे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी व सर्व मानव समाजासाठी जगण्याची तळमळ अधोरेखित करणारे ठरत आहे.

  रिसोड तालुक्यातील मोरगव्हान या छोट्या गावात जन्म घेतलेल्या डॉ. प्रल्हाद कोकाटे यांनी माऊली स्वयंसेवी संस्था या संस्थेची स्थापना  सन २००० साली करून या संस्थेच्या माध्यमातून श्री. संत गजानन महाराज निवासी मूकबधिर विद्यालय सुरू केले. निराधार, अपंग मुलांना शिक्षणबरोबर सर्व भौतिक सोयी, सुविधा येथे उपलब्ध करुन दिल्यात. या शाळेत आजमितीस चाळीस मूकबधिर मुले शिक्षण घेत आहेत. यातील बहुतांश मुले निराधार व ऊस तोड कामगारची  आहेत. समाजामधील मुकबधीर मुलांचा शोध घेत  अशा सर्व मुलांना कोकाटे यांनी शाळेत प्रवेश देवून आई,वडिलांचे प्रेम दिले. उन्हाळ्याच्या सुट्टीत ही मुले कोकाटे दाम्पत्यांच्या घरी राहतात. आतापर्यंत झालेल्या सर्व क्रिडा स्पर्धा मध्यें या मुलांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत बहुतांश बक्षिसे प्राप्त केली आहेत हे विशेष. या मुलांना शाळेत व्यायाम, शैक्षणिक साहित्य व आवश्यक सर्व वस्तू पुरविल्या जातात , सोबतच विविध प्रशिक्षण तज्ञांकडून दिल्या जात आहेत. या उपक्रमाची दखल घेत परिसरातील अनेक मान्यवर आपल्या मुलांचे  वाढदिवस, पूर्वजांचे वर्षश्राद्ध सारखे  कार्यक्रम मुलांच्या सान्निध्यात मोठया उत्साहाने साजरे करुन त्यांना मदतीचा हात पुढे करतात.  या दाम्पत्यांनी या कायार्साठी स्वत:ची नोकरी सोडून या शाळेची उभारणी केली आहे.या विधायक कार्यामध्ये कोकाटे परिवारातील सर्व सदस्य  त्यांना मदत करत असतात. मुलांच्या दैनंदिन दिनचर्येत त्रिवेणी कोकाटे ह्या आईप्रमाणेच मुलांच्या सकाळच्या आंघोळी पासून तर रात्री झोपेपर्यंत त्यांच्या गरजेनुसार सर्वपरी काळजी घेतात. भविष्यात या मुलांना स्वत:च्या पायावर उभे करून त्यांना स्वालंबी बनविण्यापर्यंतची जबाबदारी कोकाटे दाम्पत्यांच्या संस्थेने स्वीकारली आहे. 

आमच्या शाळेत शिक्षण घेणारे निराधार मूकबधिर मुले यांची सेवा करणे हे आमच्यासाठी खूप आनंद देणारे व प्रेरणादायी काम आहे. या मुलांच्या सानिध्यात राहून त्यांचे आयुष्य सुखकर करणे व त्यांच्या जीवनात वेगळी दिशा देण्याचे कार्य हेच आमचे ध्येय आहे. आतापर्यंत शाळेला अनेक लोकप्रतिनिधींनी भेटी देऊन शाळेचे कौतुक केले आहे

     - डॉ प्रल्हाद एल कोकाटे, अध्यक्ष   

मूकबधिर शाळेमधील मुलांसाठी मला आईची भूमिका निभवावी लागते व त्या मुलांना खाऊ, पिऊ घातल्याचा नंतर त्यांच्या चेहºयावरील हास्यामुळे माझ्या मनाला खूप मोठे समाधान प्राप्त होते.

-  त्रिवेणी कोकाटे, संचालक

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडSchoolशाळा