सोमवारी रात्री काजळेश्वर येथे मोठ्या प्रमाणात रात्रभर पाऊस आला. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी थांबले. रस्त्याला नाल्याचे रूप आले. अनेक ग्रामस्थांना घरात पाणी घुसल्याने त्रास सहन करावा लागला, तर बंजारा वस्तीतील प्रल्हाद मणिराम पवार यांच्या घराची भिंत पडली, तसेच तांडा वस्तीतील गणेश विष्णू राठोड यांच्या घराची सुद्धा भिंत पडल्याने त्यांचे आर्थिक नुकसान झाले. रात्री कोसळलेल्या भिंतीमुळे दैव बलवत्तर म्हणून प्राणहाणी झाली नाही. मात्र, त्यांचे आर्थिक नुकसान झाले. तेव्हा शासनाने त्यांना सानुग्रह अनुदान द्यावे, अशी मागणी येथील जनशक्ती प्रहार संघटनेचे सेवक प्रदीप उपाध्ये महादेव जाधव यांनी केली आहे. तसेच नुकसानग्रस्तांच्या घरांची पाहणी करुन तत्काळ मदत मिळेल यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली.
संततधार पावसाने घरांची पडझड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:49 IST