वाशिम : फळबाग लागवडीच्या माध्यमातून कमी पाणी व कमी खर्चात अधिक उत्पन्न घेणे शक्य आहे. ही बाब लक्षात घेऊन आगामी काही दिवसांमध्ये जिल्ह्यात किमान पाच हजार हेक्टरवर फळबागा उभ्या करण्याचे नियोजन कृषी विभागाकडून केले जात आहे.विविध स्वरूपातील फळबागांकरिता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून भरीव अनुदानाची तरतूद शासन स्तरावरून करण्यात आली आहे. त्यानुसार, सन २०१७-१८ मध्ये जिल्ह्यातील किमान पाच हजार हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवून त्यादृष्टीने नियोजन व कार्यवाही केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गावसाने यांनी ‘लोकमत’ला दिली.