शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

देशसेवा करणाऱ्या सैनिकास घर कर माफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 11:20 IST

Home tax exemption for soldiers serving the country : गावातील सैनिकाच्या घराचा कर माफ करण्याचा ठराव कारखेडा येथे ग्रामपंचायतने बैठकीत घेतला.

- माणिक डेरेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : देशसेवेसाठी आपले प्राण धोक्यात घालून सेवा देणारे व गावाचे नाव देशसीमेवर नेणाऱ्या गावातील सैनिकाच्या घराचा कर माफ करण्याचा ठराव कारखेडा येथे ग्रामपंचायतने बैठकीत घेतला.कारखेड्याच्या सरपंच्या सोनाली बबनराव सोळंके यांनी २९ जूनच्या मासिक सभेत याबाबत एकमताने ठराव मंजूर केला. ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित बैठकीत गावात एक हजार झाडे लावण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. हरीत कारखेडा ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासंदर्भात नियोजन करण्यात आले. गावातील माजी सैनिक रमेश जयराम जाधव यांचा संपूर्ण घर कर माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. सैनिक रमेश जाधव यांचे ग्रामपंचायत कार्यालयात उभे राहून टाळ्या वाजवून स्वागत करून मोफत पीठगिरणीचे कार्ड देण्यात आले. आपल्या गावच्या सैनिकानी देशाच्या सीमा सुरक्षित ठेवल्याचा आम्हाला अभिमान आहे अशा सरपंच सोनाली सोळंके यावेळी म्हणाल्या.यावेळी उपसरपंच अनिल काजळे, सचिव अनिल सूर्य, जि.प.चे मुख्याध्यापक गोविंद पोतदार, रणजित जाधव, पोलीस पाटील वासुदेव सोनोने, तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, ग्रामपंचायत सदस्य प्रमिला चव्हाण, गणेश जाधव, नीता जाधव, वर्षा मोहनराव देशमुख, दिलीप देशमुख, चैताली विवेक परांडे, मनोज किशोर तायडे आदी उपस्थित होते.

जाधव परिवाराची तिसरी पिढी देशसेवेतजाधव परिवाराचा घर टॅक्स ग्रामपंचायतने माफ केला त्या जाधव परिवाराची देशसेवेची पार्श्वभूमी फार मोठी आहे. १९६२ च्या चीनविरुध्दच्या लढाईत जयराम आकाराम जाधव यांच सहभाग होता, रमेश जयराम जाधव यांनी आंतरदेशीय जल वाहतूकमध्ये काम केले तर जाधव परिवाराचा तिसरा वंशज कमलेश रमेश जाधव देशसेवेतून निवृत्त झाला. ते नायक पदावर कार्यरत होते.

कारखेडा ग्रामपंचायतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. नियमित कर भरणाऱ्यांना दळण माेफत यासह विविध याेजना राबविण्यात येतात. कारखेडा ग्रामपंचायतच्या  मासिक सभेमध्ये माजी सैनिकास घर कर माफ करण्याच्या निर्णयावर एक मत झाल्याने व  सर्वांनी सहमती दर्शविल्याने हा निर्णय एकमताने पारित करण्यात आला.-साेनाली बबनराव साेळंके, ग्रा.पं. सरपंच, कारखेडा

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायत