शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास घरोघरी तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 11:26 IST

Coronavirus News पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळून येतील तेथे घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम : जिल्ह्यातील वाढत्या कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून ज्या गावांमध्ये पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळून येतील तेथे घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी आरोग्य यंत्रणेला सूचनाही दिल्या आहेत.जिल्ह्यात ३ एप्रिल २०२० रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. ऑगस्ट ते सप्टेंबर या दोन महिन्यात जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. त्यानंतर कोरोनाचा आलेख खालावला. जानेवारी २०२१ पर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात असताना, फेब्रुवारी महिन्यापासून शेजारच्या अकोला, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू झाला. वाशिम जिल्ह्यातही १५ फेब्रुवारीपासून कोरोनाचा कहर सुरू झाला असून, दरदिवशी शंभरावर कोरोनाबाधित आढळून येत आहेत. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले आहेत. जिल्ह्यात १५ मार्चपर्यंत जमावबंदी आदेश असून, कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव झाला असून, कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून ज्या गावांमध्ये पाचपेक्षा अधिक कोरोनाबाधित आढळून येतील, तेथे घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य यंत्रणेला दिले. त्यानुसार आरोग्यवर्धिनी केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांचे आरोग्य कर्मचारी, आशा आदींच्या माध्यमातून पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळून आलेल्या गावांमध्ये घरोघरी जाऊन तपासणीला सुरुवात करण्यात आली आहे. कोरोना संसर्गाची लक्षणे आढळून येणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणीदेखील केली जाणार आहे. वेळीच उपचार मिळाल्यास कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. नागरिकांनीदेखील या मोहिमेला सहकार्य करावे, कोणताही आजार लपवू नये, लक्षणे आढळून येताच कोरोना चाचणीसाठी पुढे यावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले. 

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार ज्या गावांमध्ये ५ पेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत, अशा गावांमध्ये घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी केली जात आहे. नागरिकांनीदेखील या मोहिमेला सहकार्य करावे. कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे.- डॉ. अविनाश आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या