शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धुलीवंदनानिमित्त विविध रंगांनी सजली बाजारपेठ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 17:59 IST

मालेगाव (वाशिम) : दोन दिवसांवर आलेल्या धुलीवंदनानिमित्त विविध स्वरूपातील रंगांनी येथील बाजारपेठ सजली असून मंगळवारी असलेल्या आठवडी बाजारात खरेदीसाठी नागरिकांची मोठी झुंबड उडाल्याचे दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम) : दोन दिवसांवर आलेल्या धुलीवंदनानिमित्त विविध स्वरूपातील रंगांनी येथील बाजारपेठ सजली असून मंगळवारी असलेल्या आठवडी बाजारात खरेदीसाठी नागरिकांची मोठी झुंबड उडाल्याचे दिसून आले. विविध प्रकारचा सुका रंग, पिचकारी, मुखवटे यासह अन्य साहित्य खरेदीकरिता उपलब्ध झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून शहरी भागात होळी आणि रंगपंचमी या सणांचे स्वरूप पालटले असले तरी ग्रामीण भागात मात्र आजही जुन्याच रुढी-परंपरेनुसार हे सण साजरे केले जातात. शेणामातीच्या विविध आकारातील चाकोल्या, एरंडाची झाडे, लाकडांचा वापर करून होळी पेटविण्याची परंपरा असून त्याच्या तयारीत अबालवृद्ध लागले आहेत. जिथे कुठे गुरांचे शेण मिळेल, तेथून ते आणायचे आणि त्यात थोडीफार माती मिसळवून सुंदर चाकोल्या तयार करायच्या. होळीपर्यंत त्या उन्हात सुकवून त्याची माळ तयार करण्याची तयारी सद्या सुरू असल्याचे दिसून येत आहे. या कामात विशेषत: ग्रामीण भागातील चिमुकली मुले आनंदाने गुंतली आहेत.पुर्वी पळसाच्या फुलांपासून रंग तयार केला जायचा. आता मात्र तयार रंग बाजारात मिळत असल्याने लोकांची सोय झाली आहे. बाजारपेठेत यावर्षी रंग थोडे महाग झाल्याने व पाणीटंचाईमुळे रंगोत्सवावर काहीसा परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :washimवाशिमHoliहोळी