शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र जडेजाची 'चिटिंग' अम्पायरने पकडली; बाद देताच, CSK च्या खेळाडूची सटकली, Video
2
"बंगालमध्ये हिंदू दुय्यम दर्जाचे नागरिक बनले"! PM मोदींचा TMC वर हल्लाबोल
3
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
4
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
5
"ओऽऽऽ *** सर्वज्ञानी…" म्हणत, चित्रा वाघ यांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर; दिला थेट इशार
6
IPL 2024 RCB vs DC: दिल्लीने टॉस जिंकला! विराट मैदानात पाऊल ठेवताच करणार वर्ल्ड रेकॉर्ड
7
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
8
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले
9
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
10
भरधाव डंपरने कारला दिली धडक, भाजपा नेत्याचा अपघातात मृत्यू
11
Mahhi Vij : "तू जादू आहेस..."; अभिनेत्री माही विजने सांगितला लेकीच्या जन्मावेळचा भावूक प्रसंग
12
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'
13
एका क्रिकेटवेड्या कपलची गोष्ट; 'Mr And Mrs Mahi' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित
14
हे व्यावसायिक, ते ४०० कोटी कमावतात तरी...! KL Rahul ला झापणाऱ्या मालकावर वीरूचा तिखट वार
15
Mother's Day 2024: आनंद महिंद्रा भावूक! शेअर केला आईसोबतचा जुना फोटो; नेटकरी गहिवरले
16
सिंग इज किंग! सिमरजीतने RR ला धक्क्यांवर धक्के दिले, CSK चे पहिल्या इनिंग्जमध्ये वर्चस्व 
17
Lok Sabha Election 2024 : औरंगजेबाचा जयजयकार, सावरकरांचा अपमान का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
18
BAN vs ZIM : झिम्बाब्वेचे शाकीब अल हसनला चोख प्रत्युत्तर; अखेरच्या सामन्यात बांगलादेश चीतपट
19
धक्कादायक! नूडल्स खाणं बेतलं जीवावर; 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब पडलं आजारी
20
'मला समुद्रात उडी मारायची...', Air India च्या विमानात प्रवाशाने घातला गोंधळ

चिमुकल्यांकडून दिला जातोय होळीच्या ‘चाकोल्यां’ना आकार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 3:27 PM

वाशिम : समाजातील प्रत्येक घटकास हवाहवासा वाटणारा रंगपंचमी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.

ठळक मुद्दे होळी-रंगपंचमीचा सण वाशिम जिल्ह्यात ठिकठिकाणी दरवर्षी हर्षोल्लासात साजरा केला जातो. शहरी भागात या सणाचे स्वरूप पालटले असले तरी ग्रामीण भागात मात्र जुन्या परंपरेनुसारच होळीचा सण साजरा केला जातो.शेणा-मातीच्या विविध आकारातील चाकोल्या, एरंड्याची झाडे, लाकूडाचा वापर करून होळी पेटविण्याची परंपरा असून त्याच्या तयारीत अबालवृद्ध लागले आहेत.

वाशिम : समाजातील प्रत्येक घटकास हवाहवासा वाटणारा रंगपंचमी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्याच्या एक दिवस आधी साजऱ्या  होणाऱ्या  होळीचीही सर्वांना आतुरता लागली असून, ग्रामीण भागात चिमुकल्यांकडून होळीत जाळल्या जाणाऱ्या  शेणा-मातीच्या ‘चाकोल्या’ तयार करण्याची लगबग सद्या सुरू असल्याचे दिसून येत आहे.हिंदु संस्कृतिमधील महत्वाच्या सणांमध्ये स्थान असणाऱ्या  होळी-रंगपंचमीचा सण वाशिम जिल्ह्यात ठिकठिकाणी दरवर्षी हर्षोल्लासात साजरा केला जातो. गेल्या काही वर्षांमध्ये शहरी भागात या सणाचे स्वरूप पालटले असले तरी ग्रामीण भागात मात्र जुन्या परंपरेनुसारच होळीचा सण साजरा केला जातो. शेणा-मातीच्या विविध आकारातील चाकोल्या, एरंड्याची झाडे, लाकूडाचा वापर करून होळी पेटविण्याची परंपरा असून त्याच्या तयारीत अबालवृद्ध लागले आहेत. जिथे कुठे गुरांचे शेण मिळेल, तेथून ते आणायचे आणि त्यात थोडीफार माती मिसळवून सुंदर चाकोल्या तयार करायच्या. होळीपर्यंत त्या उन्हात सुकवून त्याची माळ तयार करण्याची तयारी सद्या सुरू असल्याचे दिसून येत आहे. या कामात विशेषत: ग्रामीण भागातील चिमुकली मुले आनंदाने गुंतली आहेत.

टॅग्स :washimवाशिमHoliहोळी