शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘आम आदमी’तर्फे शेतकरीविरोधी विधेयकाची होळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2020 16:07 IST

शेतक-यांच्या शेतीमालाचे दर खासगी कंपन्यांना ठरवता येणार असून, आधारभूत किमतीची कोणतीही शाश्वती या विधेयकात दिली नसल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्या पदाधिका-यांनी केला.

उद्योगपतींच्या दबावाखाली येऊन केंद्र सरकारने लोकसभा व राज्यसभेमध्ये तीन शेतकरीविरोधी विधेयके पारीत केल्याचा आरोप करीत आम आदमी पक्षाच्या पदाधिका-यांनी २४ सप्टेंबर रोजी वाशिम येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात या विधेयकाची होळी केली.केंद्र सरकारने एकूण तीन विधेयके पारित केली आहेत. यामध्ये शेतक-यांच्या शेतीमालाला बाजार समितीच्या बाहेर विकण्याची मुभा दिली. परंतु शेतक-याला मिळणा-या हमीभावाबाबत स्पष्ट उल्लेख केला नाही. यामुळे शेतक-यांच्या शेतीमालाचे दर खासगी कंपन्यांना ठरवता येणार असून, आधारभूत किमतीची कोणतीही शाश्वती या विधेयकात दिली नसल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्या पदाधिका-यांनी केला.आवश्यक वस्तू कायद्यात बदल करीत खासगी व्यापा-यांना काळाबाजार करण्याची वाट मोकळी करण्यात आली आहे. यामुळे मध्यमवर्गाला महागाईचा फटका बसल्याशिवाय राहणार नाही. तसेच 'मूल्य आश्वासन व कृषी सेवा शेतकरी (सशक्तीकरण आणि संवर्धन) करार' या कायद्याद्वारे शेतकरी व खासगी कंपन्यांना कराराच्या माध्यमातून शेती करता येणार आहे. कराराच्या अटींमध्ये शेतक-यांना फसवून खासगी कंपन्यांद्वारे त्यांची पिळवणूक करणारा हा कायदा आहे, असा आरोप यावेळी पदाधिका-यांनी केला.स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात या विधेयकांची होळी करीत ‘शेती विरोधी कायदे करणा-या, शेतीमालाला हमीभाव नाकारणा-या केंद्र सरकारचा धिक्कार असो' अशी घोषणाबाजी पदाधिका-यांनी केली. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.