लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शिवसेनाप्रमुख, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या वतीने वाशिमममधील मुख्य मार्गावरून बुधवार, २३ जानेवारीला हिंदुत्व रॅली काढण्यात आली. यात शेकडो शिवसैनिकांनी सहभाग नोंदविला. महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्ष्यणिय ठरली.खासदार भावना गवळी, शिवसेना जिल्हाध्यक्ष सुरेश मापारी यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या दुचाकी वाहनांच्या रॅलीमध्ये भगवे कपडे, भगवे फेटे परिधान करून सहभागी झालेले शिवसैनिक व महिला कार्यकर्त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा जयघोष केला. स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू झालेल्या हिंदुत्व रॅलीने शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण केले.
वाशिम शहरातून निघाली ‘हिंदुत्व रॅली’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 17:30 IST