शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वाशिमात ‘हिंदूत्व’ मोटरसायकल रॅली उत्साहात!

By संतोष वानखडे | Updated: January 23, 2024 16:38 IST

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी विविध कार्यक्रम साजरे केले जातात.

वाशिम : हिंदूहृदयसम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्यावतीने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) २३ जानेवारी रोजी वाशिम शहरात ‘हिंदूत्व’ मोटरसायकल रॅली काढण्यात आली.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी विविध कार्यक्रम साजरे केले जातात. याच दृष्टीने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी ‘हिंदूत्व’ मोटरसायकल रॅली काढण्यात आली. ही रॅली सकाळी ११:३० वाजता जिजाऊ निवासस्थान सिव्हिल लाईन येथून पोस्ट ऑफीस चौक, पुसद नाका, मन्नासिंह चौक, माहुरवेस, इंदिरा चौक,  ध्रुव चौक, राजणी चौक, नगर परिषद चौक, दंडे चौक, टिळक चौक, सुभाष चौक, बालू चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पाटणी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे जिजाऊ निवास्थान येथे येऊन या रॅलीचा समारोप झाला. रॅलीमध्ये सहभागी शिवसैनिकांच्या घोषणांनी रॅलीमार्ग दुमदुमून गेला होता. तसेच शिवसैनिकांनी बांधलेले भगवे फेटे व दुचाकीवरील भगवे झेंडे यामुळे हिंदूत्व रॅली प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत होती. या रॅलीचा समारोप जिजाऊ निवासस्थान सिव्हिल लाईन येथे करण्यात आला. तसेच यावेळी शिवसैनिकांना १ क्विंटल खिचडीचे वितरण करण्यात आले. ही मोटरसायकल रॅली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा समन्वयक सुरेश मापारी, जिल्हा संघटक गजाननराव देशमुख, कॅप्टन प्रशांत सुर्वे, शहर प्रमुख गजानन भांदुर्गे यांच्या नेतृत्त्वात काढण्यात आली.

टॅग्स :washimवाशिम