शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गाच्या कामामुळे नागरिकांचा जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 12:56 IST

सर्व नियमाची तंतोतंत पालन व्हायला अपेक्षित होते परंतु कंत्राटदार एजन्सी हेतुपुरस्सर याकडे दुर्लक्ष करीत असताना दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर :शहरातून जाणाº्या दोन महामार्गाचे काम सुरु आहे. कामे करणाऱ्या दोन्ही स्वतंत्र कंत्राटदार एजन्सीने सर्व नियम धाब्यावर बसवून शहरातील रहदारीचे तीन तेरा वाजवले आहे. तसेच शहरातून जड वाहनांची सतत येºजा असल्याने, अपघातात वाढ होऊन प्रदूषणामध्ये वाढ झाली आहे. हे रस्ते बांधकाम नागरिकांच्या विशेषत: विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतले आहे.महान-आर्णी व अमरावती-वाशिम असे दोन महामार्ग शहरातून जातात. या दोन्ही रस्त्यांचे बांधकाम सध्या सुरू आहे. या महामार्गाच्या बांधकामामध्ये अवजड वाहनाचा उपयोग केल्या जात असल्याने पंचशील नगर ते शिंदे कॉलनी, बालदेव ते नदीपर्यंत या अवजड वाहनांची सतत ये-जा असते. या अवजड वाहनाचे चालक रहदारीचे सर्व नियम धाब्यावर बसवून भरधाव वेगाने ही वाहने चालवताना आढळत आहे. सर्वाधिक विद्यार्थी असलेली माध्यमिक व उच्च माध्यमिक जिल्हा परिषद हायस्कूल, सिद्धार्थ विद्यालय मंगरूळपीर अकोला मार्गावर शहरात आहे. भरधाव वेगाने चालणाºया अवजड वाहनाने विद्यार्थी व महिलांना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. सर्वत्र गिट्टी दगड पडलेले असल्याने वाहनाच्या भरधाव वेगामुळे हे गिट्टी दगड उडून नागरिकांना लागून जखमी होण्याच्या अनेक घटना दररोज घडत आहे. त्यामुळे सर्व नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. या महामागार्चे बांधकाम होत असताना त्यातील सर्व नियमाची तंतोतंत पालन व्हायला अपेक्षित होते परंतु कंत्राटदार एजन्सी हेतुपुरस्सर याकडे दुर्लक्ष करीत असताना दिसत आहे.वातावरणात धूळ उडू नये म्हणून खोदकामावर सतत पाणी शिंपडत राहणे हा त्यातील एक महत्त्वाचा घटक आहे. कंत्राटदार एजन्सी नियमाचे पालन करीत नसल्याने शहरातील प्रदूषणात वाढ होऊन नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. शासन व प्रशासन व्यवस्था यावर काहीही उपाययोजना करीत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष खदखदत आहे. शहर वाहतूक पोलीसाची आवश्यकता !शिवाजी चौक व डॉ. आंबेडकर चौकामध्ये प्रचंड प्रमाणात रहदारी निर्माण झाल्याने छोट्या अपघातात वाढ झालेली आहे. म्हणून पोलिस विभागाने दोन्ही चौकामध्ये स्वतंत्र चार ट्राफिक हवालदारांना सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत तैनात करण्याची मागणी नागरीकातून होत आहे.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीर