शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग कामातील हलगर्जीचा फटका वाहतुकीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 17:30 IST

अवकाळी पावसामुळे महामार्गावरील लहान पुलाच्या कामानजिक टाकलेल्या माती मिश्रीतब मुुरुमाचा चिखल झाला आणि वाशिम-मंगरुळपीर मार्गावरील वाहतूक तासभर ठप्प झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील हलगर्जीचा फटका वाहतुकीला बसला आहे. सोमवारी मध्यरात्री आलेल्या अवकाळी पावसामुळे महामार्गावरील लहान पुलाच्या कामानजिक टाकलेल्या माती मिश्रीतब मुुरुमाचा चिखल झाला आणि वाशिम-मंगरुळपीर मार्गावरील वाहतूक तासभर ठप्प झाली. याचा नाहक त्रास प्रवासी व मालवाहू वाहनधारकांना सोसावा लागला.जिल्ह्यात वाशिम-हिंगोली, कारंजा-वाशिम, मंगरुळपीर-आर्णी, मालेगाव-मेहकर, या मार्गांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यानंतर या मार्गांचे चौपदरीकरण राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणमार्फत करण्यात येत आहे. या कामांचे कंत्राट घेणाºया कंपन्यांनी कामाला वेगही दिला. याच मार्गावर काही ठिकाणी लहान पुलांची निर्मिती करण्यात येत असून, हे काम करताना वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून वळणमार्ग काढण्यात आले आहेत. हे वळणमार्ग काढताना मुरुमाचा वापर करून दबाई करण्यात आली. तथापि, वाशिम मंगरुळपीर मार्गावर सुरू असलेल्या पुलांच्या ठिकाणी वळणमार्ग काढताना वापरलेल्या मुरुमात मातीचे प्रमाण अधिक आहे. त्यात १९ नोव्हेंबरच्या रात्री या मार्गावरील विविध गावांत जोरदार अवकाळी पाऊस पडला. त्या पावसामुळे पुलांच्या ठिकाणी काढलेल्या वळणमार्गावर मातीमुळे चिखल तयार झाला आणि या ठिकाणी वाहने फसू लागली. वाशिम-मंगरुळपीर मार्गावरील बिटोटा भोयरपासून काही अंतरावर एका पुलाच्या ठिकाणी वळणमार्गावर तेलाचा टँकर फसला. हा टँकर काढण्यासाठी महामार्गाच्या कामासाठी आणलेल्या जेसीबीचा आधार घ्यावा लागला. याला तासभर वेळ लागल्याने मार्गावर दोन्ही बाजून वाहनांची जवळपास अर्धा किलोमीटर अंतराची रांगच लागली होती. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.वाहन काढण्यासाठी आलेली जेसीबीही फसलीमंगरुळपीर-वाशिम मार्गावरील बिटोटा भोयरपासून काही अंतरावर एका पुलाच्या ठिकाणी वळणमार्गावर फसलेला टँकर काढण्यासह वाहतूक सुरळीत करण्यासाठी जेसीबी मशीनचा आधार घेण्यात आला; परंतु टँकर बाहेर काढल्यानंतरही मार्ग मोकळा करण्याच्या प्रयत्नात ही मशीनच चिखलात फसली. ती बाहेर काढण्यासाठी दुसºया मशीनचा आधार घ्यावा लागल्याने वाहतुकीला अधिकच फटका बसला.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीर