शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

पाच एकरात वनौषधीची लागवड; कारंजातील शेतकऱ्याचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 16:21 IST

कारंजा तालुक्यातील मंगुटपूर येथील पंकज मांजरे या युवा शेतकºयाने इतर शेतकºयांसमोर आदर्श शेतीचा उत्तम नमुना ठेवला.

- प्रफुल बानगावकरलोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : पाषाणभेद, सफेद मुसळी, अश्वगंधा, काळमेघ आदी वनौषधी शेतीचा यशस्वी प्रयोग साकारून कारंजा तालुक्यातील मंगुटपूर येथील पंकज मांजरे या युवा शेतकºयाने इतर शेतकºयांसमोर आदर्श शेतीचा उत्तम नमुना ठेवला.मंगुटपूर येथील पंकज मांजरे या युवकाने अभियांत्रिकीचे शिक्षण झाल्यानंतर आपला मोर्चा शेतीकडे वळविला. पारंपारिक पद्धतीने शेती न करता नवनवीन प्रयोग करून शेतीची कास धरली. वनौषधी शेतीसंदर्भात माहिती मिळाल्यानंतर, त्या अनुषंगाने इत्यंभूत माहिती घेतली. पाषाणभेद, सफेद मुसळी, अश्वगंधा, काळमेघ ही वनौषधी आणि त्यासाठी उपलब्ध बाजारपेठ याची माहिती घेतल्यानंतर त्यांनी सन २०१७-१८ च्या सुमारास त्यांनी वनौषधी शेतीचा प्रयोग अंमलात आणला. दोन एकरात सफेद मुसळी आणि प्रत्येकी एका एकरात पाषाणभेद, अश्वगंधा व काळमेघ या वनौषधीची लागवड केली. आंतरपिक म्हणून सागवान झाडांची लागवड केली. पाच एकर वनौषधी शेतीतून लागवड व मशागत खर्च वजा जाता पावणे पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. सफेद मुसळी शेतीसाठी दोन लाख रुपये लागवड व मशागत खर्च येतो आणि उत्पादन पाच लाखाचे होते. निव्वळ नफा तीन लाख रुपये मिळतो. पाषणाभेद शेतीत ४२ हजार रुपये नफा, अश्वगंधा शेतीतून ६५ हजार व काळमेघ शेतीतून ५५ हजार रुपये नफा मिळतो, असे मांजरे यांनी सांगितले. या वनस्पतीवर किडींचा प्रादुर्भाव होत नसल्याने फवारणी खर्च नाही तसेच या पिकांकरीता शेणखत हे उत्तम खत म्हणुन वापरले जाते. वातावरणाचा कोणताही परिणाम होत नाही. वनौषधीकरीता कोणतेही जमिन त्यातल्या त्यात पाणी निचरा करणारी  जमिन अतीउत्तम, असे मांजरे यांनी सांगितले.कानपूर, मुबंई व दिल्ली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध आहे. पाषाणभेद हे रक्त शुद्धीकरण, वजन कमी करण्यासाठी तसेच सफेद मुसळी हे शक्तीवर्धक म्हणून वापर केला जातो. परराज्यात विक्री केली जाते. तालुका कृषी अधिकारी संतोष वाळके म्हणाले की, मांजरे यांनी नवीन प्रयोग करून इतरांसमोर प्रेरणा निर्माण केली. वनौषधी शेतीतून ते भरघोष उत्पादन घेत असून, कृषी विभागातर्फे मार्गदर्शन केले जाते.

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्रKaranjaकारंजा