शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

आसेगाव पोलिसांच्यावतीने ‘सलोखा दौड’ उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:38 IST

जातीभेद दूर करण्याचे आवाहन: शेकडो विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कआसेगांव: पोलीस स्टेशन आसेगाव अंतर्गत येणाऱ्या ५२ गावांतील जातीभेद नष्ट करण्याचे आवाहन करून आगामी धार्मिक सणउत्सव शांततेत साजरे करण्याचा संदेश देण्यासाठी जातीय पोलिसांच्यावतीने सोमवार १७ जुलै रोजी ‘सलोखा दौड’चे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात पोलीस कर्मचारी, तसेच धानोरा येथील शाळांमधील शिक्षकवृंदांसह विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या आदेशानुसार सोमवार १७ जुलै रोजी सकाळी १० वाजता आसेगाव पोलिसांकडून सोमवारी सलोखा मॅरेथॉन आयोजित करण्यात आली. या आगळ्यावेगळ्या उपक्रमात धानोरा खुर्द येथील धानोरकर आदर्श उच्चप्राथमिक, माध्यमिक व उच्चमाध्यमिक माध्यमिक शाळेमधील ५ वी ते. १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसह मुख्याध्यापक मंगेश धानोरकर, कर्मचारी, दिनेश चव्हाण, अमोल घुले उर्फ बंटी पाटील, तसेच आसेगाव पोलीस स्टेशनमधील सर्वच कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. धानोरकर आदर्श विद्यालयाच्या प्रांगणापासून ते एक किलोमीटर अंतरावर असलेल्या बसथांब्यापर्यंत ही सलोखा दौड घेण्यात आली. या मॅरेथॉन स्पर्धेदरम्यान जातीभेद दूर सारून आगामी गणेशोत्सव, बकरी-ईद, तसेच दूर्गोत्सव हे सणउत्सव शांततापूर्ण वातावरणात साजरे करण्याचे आवाहन करणाऱ्या घोषणा देण्यात आल्या. आसेगाव पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या गिराटा, गोस्ता, खेर्डा, चिखलागड, गिर्डा, रणजीतनगर, उज्वल नगर, वार्डा, साळंबी, सावरगांव , भिलडोंगर, खापरदरी, हळदा, विळेगांव, खांबाळा, रुई, पाळोदी, ढोणी, शेंदुरजना, चिंचोली, दाभडी, रामगड़, मथुरा तांडा भडकुंभा, वटफळ, मेंद्रा, इंगलवाडी, हिवरा, सनगांव, शेगी, चिचखेडा, रामगांव, मोतसावंगा, ईचोरी, फाळेगांव, सार्सी, मसोला, दस्तापूर, बिटोडा, कळंबा, कासोळा, धानोरा, नांदगाव, शिवणी, लही, वसंतवाड़ी, वाराजहांगीर , देपूळ, कुंभी, आसेगाव आणि पिंपळगाव आदि ५२ गावांतील जातीभेद दूर सारून आगामी सणउत्सव शांततेत साजरे करण्याचे आवाहन करण्यासाठी आसेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनायक जाधव आणि पोलीस उपनिरीक्षक अमोल जाधव यांच्या मार्गदर्शनात या सलोखा दौडचे आयोजन करण्यात आले होते.