शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

वाशिम जिल्ह्यात कुठे दमदार पाऊस; तर कुठे पूर्णत: उघाड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 16:22 IST

वाशिम : जिल्ह्यात चालू वर्षीच्या पावसाळ्यात कुठे दमदार पाऊस; तर कुठे पूर्णत: उघाड, अशी पावसाची स्थिती असून निसर्गाच्या या अजब खेळापुढे नागरिक हतबल झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात चालू वर्षीच्या पावसाळ्यात कुठे दमदार पाऊस; तर कुठे पूर्णत: उघाड, अशी पावसाची स्थिती असून निसर्गाच्या या अजब खेळापुढे नागरिक हतबल झाले आहेत. दरम्यान, २० जुलैपर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ २२ टक्के पर्जन्यमान झाले असून नदी-नाले, सिंचन प्रकल्पांसह अन्य जलस्त्रोतांच्या पाणीपातळीत कुठलीच वाढ झालेली नाही. वाशिम जिल्ह्यात २० जुलै रोजी सरासरी २.२३ मिलीमिटर पाऊस झाला; मात्र हा पाऊस सहा तालुक्यांपैकी केवळ मंगरूळपीर (५.७९ मिलीमिटर) आणि कारंजा (४.९४ मिलीमिटर) या दोन तालुक्यातच अधिक प्रमाणात असून मानोरा तालुक्यात १.८ मिलीमिटर, वाशिम ०.९, मालेगाव ०.९७ आणि रिसोड तालुक्यात ०.५० मिलीमिटर इतक्या कमी प्रमाणात पावसाची नोंद झाली. यातही विशेष म्हणजे ठराविक एकाठिकाणी पाऊस सुरू असताना त्याच्या ४०० ते ५०० मीटरच्या अंतरात पाऊस नसल्याचा अनुभव नागरिकांनी घेतला. निसर्गाच्या या लहरीपणाचा जबर फटका खरीपातील पिकांना बसण्यासोबतच पाणीटंचाईचा प्रश्न देखील दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे.  अपेक्षित पर्जन्यमानात १७० मिलीमिटरने घट!वाशिम जिल्ह्यात १ जून ते २० जुलै या कालावधीत सरासरी ३३० मिलीमिटर पाऊस कोसळणे अपेक्षित असते. यावर्षी मात्र त्यात तब्बल १७० मिलीमिटरने घट झाली असून २० जुलै २०१९ पर्यंत केवळ १६० मिलीमिटर पाऊस झाला आहे. त्याची टक्केवारी जेमतेम २२.५४ आहे.

टॅग्स :washimवाशिमRainपाऊस