शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
3
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
4
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
5
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
6
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
7
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
8
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
9
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
10
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती
11
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
12
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
13
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
14
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
15
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
16
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
17
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
18
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
19
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
20
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे

वाशिम : अनियमितता आढळून आलेल्या विभाग प्रमुखांची मंत्रालयात होणार सुनावणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 20:18 IST

वाशिम : १७ ते १९ जानेवारी दरम्यान विधिमंडळाच्या पंचायत राज समितीच्या निदर्शनात वाशिम जिल्हा परिषदेच्या काही विभागाच्या कामकाजात अनियमितता आढळून आली असून, संबंधित विभाग प्रमुख व अधिका-यांची मंत्रालयात (मुंबई) सुनावणी घेण्यात येणार असल्याची माहिती पंचायत राज समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर पारवे यांनी शुक्रवारी दिली.

ठळक मुद्दे पंचायत राज समिती अध्यक्षांची माहिती सिंचन विहिर लाभार्थी निवड प्रक्रियेवर घेतला आक्षेप

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : १७ ते १९ जानेवारी दरम्यान विधिमंडळाच्या पंचायत राज समितीच्या निदर्शनात वाशिम जिल्हा परिषदेच्या काही विभागाच्या कामकाजात अनियमितता आढळून आली असून, संबंधित विभाग प्रमुख व अधिका-यांची मंत्रालयात (मुंबई) सुनावणी घेण्यात येणार असल्याची माहिती पंचायत राज समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर पारवे यांनी शुक्रवारी दिली. जिल्हा परिषदेच्या स्थानिक वसंतराव नाईक सभागृहात सन २०१३-१४ या वर्षातील वार्षिक प्रशासन अहवालासंदर्भात अधिका-यांची साक्ष घेतल्यानंतर पारवे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा केली.१७ जानेवारीला पंचायत राज समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर पारवे यांच्यासह १० आमदार सदस्य व मंत्रालयातील उच्च पदस्थ अधिकाºयांनी वाशिम जिल्हा परिषदेच्या २०१२-१३ च्या लेखा परीक्षा पुनर्विलोकन अहवालातील परिच्छेदासंदर्भात तसेच वार्षिक अनुपालन अहवालाच्या अनुषंगाने एकूण ५६ आक्षेपांवरील तपासणी व सुनावणी घेतली. १८ जानेवारी  पंचायत राज समितीच्या तीन पथकांनी दिवसभरात सहा पंचायत समिती स्तरावर स्तरावर गटविकास अधिकारी व संबंधित अधिका-यांची प्रश्नावली क्रमांक दोनसंदर्भात सुनावणी घेतली. तसेच सहा तालुके पिंजून काढत ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा, शासकीय व अनुदानित वसतिगृह, प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी, ग्रामपंचायत, पशुसंवर्धन दवाखाने यासह जिल्हा परिषद व पंचायत समितीशी संबंधित कार्यालयांची आकस्मिक पाहणी केली. काही ठिकाणी अनियमितता आढळली तर काही ठिकाणी समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत.१९ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात जिल्हा परिषदेच्या सन २०१३-१४ या वर्षाच्या वार्षिक प्रशासन अहवालासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी व विभागप्रमुखांची साक्ष घेण्यात आली. २ वाजेपर्यंत चाललेल्या या तपासणी व सुनावणीदरम्यान काही योजनांची अंमलबजावणी करताना दिरंगाई झाली तसेच काही विभागाच्या कामकाजात अनियमितता आढळून आल्याची समिती अध्यक्षांसह सदस्यांच्या निदर्शनात आले. दुपारी २.३० वाजताच्या सुमारास समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर पारवे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधत, अनियमितता करणारे काही विभागप्रमुख व अधिकारी हे पंचायत राज समितीच्या रडारवर असल्याचे सुतोवाच केले. विधिमंडळाच्या नियमानुसार गोपनियतेचा भाग म्हणून पारवे यांनी १७ ते १९ जानेवारी अशा तीन दिवस चाललेल्या तपासणी व सुनावणीचा तपशील सांगता येणार नसल्याचे स्पष्ट करून काही कामात अनियमितता झाल्याचे सांगितले. महिला व बालकल्याण, लघु सिंंचन, बांधकाम, समाजकल्याण, कृषी, शिक्षण, पशुसंवर्धन आदी विभागात अनियमिता झाल्याचे आढळून आले असून, पुढील कार्यवाही म्हणून संबंधित अधिकाºयांची मुंबई येथे सुनावणी लावण्यात आल्याचे स्पष्ट केले. सुनावणीदरम्यान अधिका-यांकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत तर नियमानुसार योग्य ती कार्यवाही निश्चित केली जाईल, असे पारवे यांनी सांगितले.  विहिर लाभार्थी निवड प्रक्रिया ही शासकीय नियम डावलून ईश्वर चिठ्ठीद्वारे करण्यात आल्याने यासंदर्भात संबंधित अधिका-यांची सुनावणी मंत्रालयात घेतली जाणार आहे. ताडपत्री योजनेत अनियमितता झाली असून, एकाच लाभार्थीच्या नावावर दोन ते तीन वेळा लाभ देण्यात आल्याचेही आढळून आल्याने यासंदर्भात इत्यंभूत अहवाल, लाभार्थी व संबंधित अधिका-यांच्या स्वाक्षरीची कागदपत्रे  मागविण्यात आल्याचे पारवे म्हणाले. जिल्हा परिषदेच्या शाळेत काही विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला नसल्याचे आढळून आल्याने गणवेश तातडीने देण्याचे निर्देश देण्यात आले. वाशिम जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक वाढविण्यासाठी शिक्षण, आरोग्य,  सिंचन आदींवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्याच्या सूचनाही संबंधितांना देण्यात आल्या, असे समिती अध्यक्ष सुधीर पारवे यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिम