शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

साथीचे आजार; जवळा येथे आरोग्य पथकाची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 13:55 IST

लोकमतने २४ जुनच्या अंकात वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर आरोग्य पथकाने येथे सोमवारी भेट देऊन १९२ घरांची व जलस्त्रोतांची पाहणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम): तालुक्यातील जवळा येथे साथीचे आजार बळावण्यास सुरुवात झाली होती. येथील सुनिता चव्हाण या महिलेस त्यामुळेच ग्रामीण रुग्णालयात दाखल करावे लागले होते. या संदर्भात लोकमतने २४ जुनच्या अंकात वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर आरोग्य पथकाने येथे सोमवारी भेट देऊन १९२ घरांची व जलस्त्रोतांची पाहणी केली. गावात ठिकठिकाणी सांडपाण्याचे गटार साचल्याचे आरोग्य विभागाला दिसले. या संदर्भात ग्रामपंचायतला साफसफाई करण्याच्या व जलस्त्रोतांचे शुद्धीकरण करण्याच्या सुचनाही आरोग्य अधिकाऱ्यांनी केल्या. दरम्यान, २५ जुन रोजीही मोप प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष सिंग यांनीही गावाला भेट देऊन पाहणी केली.रिसोड तालुक्यातील जवळा येथे गेल्या आठवड्यात अतिसारासह इतर साथीचे आजार बळावण्यास सुरुवात झाली होती. काही ग्रामस्थांना हगवण आणि उलट्यांचा त्रासही सुरू झाला होता. याच आजाराची लागण झालेल्या सुनिता संजय चव्हाण या महिलेस उपचारासाठी रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात सहा दिवसांपूर्वी दाखल करण्यात आले होते. पावसाळ्याच्या दिवसांत आजार बळावत असल्याने ग्रामस्थांत भितीचे वातावरणही निर्माण झाले होते. लोकमतने या संदर्भात ह्यजवळा येथे साथीचे आजारह्ण वृत्त प्रकाशित करून आरोग्य विभागाचे लक्ष वेधले. त्याची दखल घेऊन आरोग्य अधिकाऱ्यांनी जवळा येथे २४ जुन रोजीच पथकासह भेट देऊन १९२ घरांसह जलस्त्रोतांची तपासणी केली. यावेळी गावातील पाणी पुरवठ्याचे नळ, तसेच विहिरींसह ठिकठिकाणी सांडपाण्याचे गटार साचल्याचे, तसेच घाणकचºयाचे ढिग पसल्याचे आरोग्य विभागाला दिसून आले. त्यामुळे गावात स्वच्छता अभियान राबविण्यासह जलस्त्रोतांचे शुद्धीकरण करण्याच्या सुचना आरोग्य अधिकाºयांनी दिल्या. यावेळी डॉ. नागरे यांच्यासह आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका आणि आशासेविकांची उपस्थिती होती. त्यानंतर २५ जुन रोजी मोप प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष सिंग यांनी जवळा येथे भेट दिली.

जवळा येथे २४ आणि २५ जुन रोजी भेट देऊन पाहणी केली. यावेळी जलस्त्रोतांतील पाणी दुषित असल्याचे आणि पाणी पुरवठ्याच्या नळशेजारी, तसेच गावात गटारे साचल्याचे दिसले. त्यामुळे सरपंचांना गावात साफसफाई करून जलस्त्रोतांचे शुद्धीकरण करण्याच्या सुचना दिल्या. पावसाळ्यात सुरुवातीचे पाणी दुषित राहणार असल्याने पिण्यासाठी शुद्ध पाणी वापरण्याच्या सुचनाही केल्या. दरम्यान, गावात अतिसाराची लागण झालेला केवळ एकच रग्ण आढळून आला.-डॉ. आशिष सिंगवैद्यकीय अधिकारीप्राथमिक आरोग्य केंद्र मोप.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोड