शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
2
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
3
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
4
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
5
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
6
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
7
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
8
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
9
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
10
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
11
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
12
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
13
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
14
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
15
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
16
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!
17
मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पुरेसा पोहचला नाही, इंग्रजांसह स्वकीयही जबाबदार- मुख्यमंत्री फडणवीस
18
“कोकणच्या हिताचे चांगले काम करा, टीकेत अडकून राहू नका”; भास्कर जाधवांचा योगेश कदमांना सल्ला
19
Maharashtran Rains: दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता 
20
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक

अनियमिततेची नगराध्यक्षांनी मागितली माहिती

By admin | Updated: February 6, 2015 02:22 IST

रिसोड नगर परिषद कर विभाग: कर्मचा-यांचे धाबे दणाणले.

रिसोड (वाशिम) : येथील नगर परिषदेच्या कर विभागात दिवसागणिक आर्थिक अपहार समोर येत असल्याने कर विभागातील लाखोंचा घोटाळय़ाने शहरातील मालमत्ताधारक धास्तावले आहेत. कर विभागातील आर्थिक गैरव्यवहाराची गंभीर दखल घेत नगराध्यक्षा प्रतिभा उल्हास झडपे यांनी मुख्याधिकारी यांना कर विभागातील आर्थिक अपहाराची इत्यंभूत माहिती लेखी स्वरूपात मागितल्याने या घोटाळय़ात सहभागी असलेल्या कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले आहे. नगराध्यक्ष यांनी मुख्याधिकार्‍यांना एका पत्राद्वारे कर विभागासह शहरातील नागरिक मालमत्ता कराचा भरणा कर संग्राहकाकडे करतात. सदर कराचा भरणा झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी कर संग्राहक हे सहाय्यक कर निरीक्षकाकडे सदर रक्कम जमा करतात. दरम्यान, सहाय्यक कर निरीक्षक हे दैनंदिन संग्राहकाचे पावती पुस्तक तपासून त्याची चलान स्वीकारतात.यानंतर रोखपालाकडे सर्व कर संग्राहकांची एकत्रित चलान करून जमा करतात, अशी प्रचलित पद्धत आहे; परंतु गत काही महिन्यांपपासून कर संग्राहक हे सहाय्यक कर निरीक्षक यांच्या संगनमताने लाखो रुपयांचा अपहार करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. याशिवाय या अपहारामध्ये कोणकोणते कर संग्राहक, कर्मचार्‍यांवर कोणती कार्यवाही प्रस्तावित केली आहे, अपहाराबाबत सहाय्यक कर निरीक्षक यांची विभाग प्रमुख या नात्याने काय भूमिका आहे, सहाय्यक कर निरीक्षक यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केल्याबद्दल त्यांच्यावर कोणती कार्यवाही प्रस्तावित केली अशा प्रश्नांची उत्तरे मुख्याधिकारी यांना मागितली आहे. दिलेल्या पत्राची प्रत जिल्हाधिकारी वाशिम यांनासुद्धा पाठविण्यात आली आहे.