शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बोरव्हावासीयांचे श्रमदानाचे कार्य कौतुकास्पद - शंभूराजे देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 18:21 IST

Shambhuraje Desai News : पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी जलसंधारण कामांची माहिती घेतली.

वाशिम : बोरव्हा येथील ग्रामस्थांनी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत राज्यात चमकदार कामगिरी केली. गावकऱ्यांनी श्रमदानातून केलेले काम कौतुकास्पद आहे. गावाचा विकास साधण्यासाठी ग्रामस्थ करीत असलेल्या प्रयत्नांना शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी बोरव्हा (ता. मंगरुळपीर) येथे २८ डिसेंबर रोजी केले.पालकमंत्री देसाई यांनी बोरव्हा गावाला भेट देऊन गावात झालेल्या जलसंधारणाच्या कामांची माहिती घेतली. यावेळी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस., निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावर, सरपंच गोपाल लुंगे, पाणी फाउंडेशनचे सुभाष नानवटे यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी गावकऱ्यांनी गावाच्या आदर्श पाणलोट प्रतिकृतीच्या सहाय्याने गावाची भौगोलिक स्थिती, श्रमदानातून झालेली कामे आदी विषयी माहिती दिली. तसेच गावामध्ये मोठ्या शेततळ्याची निर्मिती करणे व अडाण नदीतील पाणी सौरपंपाच्या सहाय्याने शेततळ्यामध्ये टाकून प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये विद्युत पंपाशिवाय पाणी पोहोचविण्याचे नियोजन असल्याचे सांगितले.पालकमंत्री देसाई म्हणाले, बोरव्हा येथील ग्रामस्थांनी आपल्या गावाच्या विकासाचे स्वप्न पाहिले असून त्यासाठी एकत्र येऊन लोकसहभागातून फार मोठे काम केले आहे. तसेच आणखी काही कामांचे नियोजन करून ती पूर्ण करण्यासाठी गावकऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांचे हे प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहे. लोकसहभागातून गावाचा पाण्याचा, सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या या गावकऱ्यांना शासन सवोर्तोपरी मदत करेल, अशी ग्वाही दिली.

टॅग्स :washimवाशिमShambhuraj Desaiशंभूराज देसाई