शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

फलोत्पादनाचा आलेख खालावला!

By admin | Updated: January 31, 2017 02:50 IST

चार वर्षांंत १५00 वरून १३३ हेक्टरपर्यंंत घसरण; आवळा, कागदी लिंबू, पेरू, फणस हद्दपार.

सुनील काकडे वाशिम, दि. ३0- कधीकाळी डाळिंब, द्राक्ष, पपई, संत्रा यांसह इतर फळबागांच्या माध्यमातून शेतकर्‍यांची आर्थिक उन्नती साध्य होऊ लागली होती; मात्र नैसर्गिक आपत्ती तथा तांत्रिक मार्गदर्शनाचा अभाव, या कारणांमुळे जिल्हय़ात गत चार वर्षात फलोत्पादनाचा आलेख सुमारे ८५ टक्क्याने खालावला आहे. २0१२-१३ मध्ये फळबागांचे असलेले १५0७.९७ हेक्टर क्षेत्र सध्या केवळ १३३.५८ हेक्टरवर स्थिरावले आहे.जिल्ह्यात खरीप हंगामात साधारणत: ४.५ लाख आणि रब्बी हंगामात १ लाख हेक्टरच्या आसपास पारंपरिक पिकांची पेरणी केली जाते; परंतु तीच ती पिके वारंवार घेतली जात असल्याने शेतीचा कस बिघडत चालला असून, शेतमालाच्या उत्पादनात वर्षागणिक घट होत आहे. ही बाब लक्षात घेता फळबागांचे क्षेत्र वाढविण्यावर प्रशासनाने विशेष भर द्यायला हवा. माती परीक्षणांती आणि हवामानाधारित कुठल्या जमिनीत कुठल्या फळबागा तग धरू शकतात, याचे शास्त्रोक्त मार्गदर्शन शेतकर्‍यांना मिळायला हवे; मात्र कृषी विभागाकडून तसे ठोस प्रयत्न होताना दिसत नाहीत. परिणामी, शेतकर्‍यांनी स्वयंस्फूर्तीने लागवड केलेल्या फळबागादेखील आजमितीस नामशेष झाल्या आहेत.कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यात सन २0१२-१३ मध्ये संत्रा, डाळिंब, सीताफळ, आंबा, मोसंबी, आवळा, कागदी लिंबू, पेरू, जांभूळ, फणस अशा सर्वच फळांची यशस्विरीत्या लागवड करण्यात आली होती. त्याचे एकंदरीत क्षेत्र तब्बल १५0७.९७ हेक्टरवर पोहोचले होते. यात संत्रा, आंबा आणि फणसची विक्रमी लागवड झाली होती; मात्र दुसर्‍याच वर्षी अर्थात २0१३-१४ मध्ये फळबाग लागवड क्षेत्रात घट होत १६६.६५ हेक्टरची प्रत्यक्ष लागवड झाली. या वर्षांंंत मोसंबी, पेरू, जांभूळ आणि फणस या फळांची लागवड शून्य होती. त्यानंतर २0१४-१५ मध्ये ३८५.९५, २0१५-१६ मध्ये १४५.१0 आणि २0१६-१७ मध्ये फळबाग लागवड क्षेत्रात विक्रमी घट होत केवळ १३३.५८ हेक्टर क्षेत्रावर संत्रा, डाळिंब, सीताफळ, आंबा आणि मोसंबीचा काहीअंशी समावेश असून आवळा, कागदी लिंबू, पेरू, जांभूळ आणि फणसाची लागवड शून्य आहे. विशेष गंभीर बाब म्हणजे २0१२-१३ मध्ये जिल्ह्यात ४१९.२४ हेक्टरवर लागवड झालेल्या संत्र्याचे क्षेत्र सध्या केवळ ३८.१0 हेक्टरवर आल्याचे दिसून येत आहे.