शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
7
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
8
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
9
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
10
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
11
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
12
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
13
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
14
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
15
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
16
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
17
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
18
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
19
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
20
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सोमवारी हात धुवा मोहिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 14:54 IST

वाशिम - स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये १५ ऑक्‍टोबर रोजी जागतिक हात धुवा दिन साजरा करण्याचे आवाहन जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये १५ ऑक्‍टोबर रोजी जागतिक हात धुवा दिन साजरा करण्याचे आवाहन जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे यांनी केले. याबाबत  सर्व गटविकास अधिकारी यांना लेखी पत्राद्वारे निर्देश देण्यात आले आहेत. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या स्वच्छतेच्या विविध उपक्रमांपैकी वैयक्तिक स्वच्छतेसाठी हात धुणे हा एक महत्वाचा भाग आहे . लोकांच्या स्वच्छतेबाबतच्या जाणिवा अधिक समृद्ध होऊन सुदृढ, निरोगी व आनंददायी जीवनासाठी जागतिक स्तरावर १५ ऑक्‍टोबर हा दिवस दरवर्षी हात धुवा दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक हात धुवा दिनासाठी आरोग्य संघटनेने 'क्लीन हॅन्ड - ए रिसिप फाॅर हेल्थ' हे ब्रीद वाक्य निश्चित केले आहे. हात धुवा दिनाच्या संकल्पनेला धरून अन्न स्वच्छता, हात धुण्याच्या महत्त्वाच्या वेळा विशेषत: जेवणापूर्वी, बाळाला भरविण्यापूर्वी, बाळाची शी धुतल्यानंतर आणि शौचाहुन  आल्यानंतर साबणाने, हॅन्ड वाॅशने किंवा राखेने हात स्वच्छ धुवावेत असा संदेश देण्यात यावा असे निर्देश प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र इत्यादी ठिकाणी  जाणीव जागृती करण्यासाठी यापूर्वी शासनामार्फत पुरविण्यात आलेल्या अाय.ई.सी. टुल कीट चा वापर करावा असे निर्देश जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने इस्कापे यांनी सर्व गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.

टॅग्स :washimवाशिमSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान