शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात मोफत प्रवेशाच्या अर्ध्याअधिक जागा रिक्तच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 14:31 IST

वाशिम : वारंवार मुदतवाढ मिळाल्यानंतरही जिल्ह्यातील २५ टक्के कोट्यातील मोफत प्रवेशाच्या अर्ध्याअधिक जागा रिक्तच असल्याचे दिसून येते. काही शाळांनी अपूर्ण माहिती भरल्याचा तर काही नामांकित शाळांनी पूर्वीची नोंदणी यावर्षी अल्पसंख्याक शाळा म्हणून केल्याचा फटका यावर्षी गोरगरीब विद्यार्थ्यांना बसत आहे. 

ठळक मुद्दे आतापर्यंत वाटप झालेल्या प्रवेशाच्या जागा सोडून उर्वरीत रिक्त जागांसाठी उपरोक्त सुधारित व्याख्येप्रमाणे अर्ज मागविण्यात आले. आरटीईअंतर्गत जिल्ह्यात १०२  खासगी शाळा येत असून, मोफत प्रवेशासाठी ११७३ जागा आहे. ७२२ विद्यार्थ्यांची निवड झाली तर ५२६ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. अद्याप अर्ध्यापेक्षा अधिक जागा रिक्त आहेत.

 वाशिम : वारंवार मुदतवाढ मिळाल्यानंतरही जिल्ह्यातील २५ टक्के कोट्यातील मोफत प्रवेशाच्या अर्ध्याअधिक जागा रिक्तच असल्याचे दिसून येते. काही शाळांनी अपूर्ण माहिती भरल्याचा तर काही नामांकित शाळांनी पूर्वीची नोंदणी यावर्षी अल्पसंख्याक शाळा म्हणून केल्याचा फटका यावर्षी गोरगरीब विद्यार्थ्यांना बसत आहे. शिक्षण हक्क कायद्याने दिव्यांग, मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील २५ टक्के विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो. वंचित गट व दुर्बल गटासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली होती. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने वंचित गटामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दिव्यांग बालकांव्यतिरिक्त वि.जा. (अ), भटक्या जमाती (ब), भटक्या जमाती (क), भटक्या जमाती (ड), इतर मागासवर्ग (ओबीसी) व विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी) यांचा समावेश करण्यात आला. तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे अनुषंगाने एचआयव्ही बाधित, एचआयव्ही प्रभावित बालकांचाही समावेश केला. उपरोक्त सुधारणेप्रमाणे शिक्षण विभागाने मोफत प्रवेश प्रक्रियेत ‘वंचित गट व दुर्बल गटा’च्या व्याख्येत बदल केले असून, आतापर्यंत वाटप झालेल्या प्रवेशाच्या जागा सोडून उर्वरीत रिक्त जागांसाठी उपरोक्त सुधारित व्याख्येप्रमाणे अर्ज मागविण्यात आले. याची अंतिम मुदत १३ जून अशी करण्यात आली होती. १२ व १३ जून रोजी तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने अर्ज सादर करणे अशक्य झाले होते. त्यामुळे १७ जूनपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ दिलेली आहे. अंतिम मुदतीपर्यंतही पुरेशा प्रमाणात आॅनलाईन अर्ज सादर झाले नाहीत. आरटीईअंतर्गत जिल्ह्यात १०२  खासगी शाळा येत असून, मोफत प्रवेशासाठी ११७३ जागा आहे. आतापर्यंत एकूण १३६६ आॅनलाईन अर्ज आले असून, ७२२ विद्यार्थ्यांची निवड झाली तर ५२६ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. अद्याप अर्ध्यापेक्षा अधिक जागा रिक्त आहेत. शाळांची चुक विद्यार्थ्यांना भोवणारशिक्षण हक्क कायद्यानुसार, प्राथमिक किंवा ज्या प्राथमिक शाळेला पूर्वप्राथमिक वर्ग जोडला असेल अशा शाळेच्या पहिल्या वर्गात एकूण प्रवेशाच्या २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. यावर्षी काही शाळांनी प्राथमिक वर्गाला पूर्वप्राथमिक वर्ग जोडलेला असतानाही, आॅनलाईन प्रक्रियेत केवळ पहिल्या वर्गाचीच माहिती भरली. त्यामुळे पूर्वप्राथमिकसाठी अर्ज भरताना संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना अडचणी येत आहेत.बॉक्स..

अल्पसंख्याक शाळा नोंदणीचाही फटकाजिल्ह्यातील काही नामांकित शाळांनी मोफत प्रवेशाच्या कटकटीतून एकदाची सुटका म्हणून यावर्षी अल्पसंख्याक शाळा म्हणून नोंदणी केली. यासाठीचे सर्व प्रशासकीय सोपस्कारही पार पाडले. अल्पसंख्याक शाळांसाठी मोफत प्रवेश प्रक्रिया लागू नसल्याने या नामांकित शाळांमध्ये मोफत कोट्यातून आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करण्याचे गोरगरीब पालकांचे स्वप्न यावर्षी पूर्ण होऊ शकले नाही.

टॅग्स :washimवाशिमeducationशैक्षणिक