शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

वाशिम जिल्ह्यातील निर्मल अभियानातील निम्मे लाभार्थी अनुदानापासून वंचित

By admin | Updated: May 19, 2014 01:14 IST

अनुदान वाटपाबाबत उदासीनतेमुळे अभियानात शौचालयांचे बांधकाम करूनही ५१.0५ टक्के लाभार्थी अनुदानापासून वंचित आहे.

वाशिम : निर्मल भारत अभियानांतर्गत सन २0१३-१४ या आर्थिक वर्षामध्ये जिल्हय़ात वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम करणार्‍या १0 हजार १४६ लाभार्थ्यांपैकी मार्चअखेर मार्च १४ नंतर आतापर्यंत केवळ ४९१८ लाभार्थ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचे वाटप करण्यात आले. जिल्हा परिषदेतील पाणीपुरवठा व स्वच्छता समिती जिल्हाभरात विविध गावातील पात्र लाभार्थ्यांना वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम करण्यास प्रेरित करीत असली तरी पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावरील या यंत्रणा योजनेतील लाभार्थ्यांना अनुदान वाटपाबाबत उदासीन असल्यामुळे शौचालय बांधकाम करणार्‍या निम्म्याहून अधिक लाभार्थ्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागले आहे. जिल्हय़ात सन २0१३-१४ मध्ये निर्मल ग्राम अभियानांतर्गत २0५२८ वैयक्तिक शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट होते; परंतु पंचायत स्तरावर शौचालय, बांधकामासाठी अनुदान योजनेंतर्गत प्रस्ताव सादर करताना आवश्यक असलेली अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचे, अल्पभूधारक, भूमिहीन शेतमजूर, अपंग, कुटुंबप्रमुख, विधवा, परितक्ता व महिला कुटुंबप्रमुख असल्याबाबतच्या आवश्यक कागदपत्रांऐवजी अन्य विविध प्रकारची कागदपत्रे मागण्याचे शपथपत्र मागण्याच्या प्रकारामुळे १0 हजार १४६ लाभार्थीच वैयक्तिक शौचालये बांधू शकले. या १0 हजार १४६ लाभार्थ्यांना शौचालय बांधणीनंतर प्रत्येकी ४५00 रुपयांचा अनुदानाचे धनादेश वाटप करणे आवश्यक होते; परंतु या धनादेशांचे वाटप करण्यास नाहक विलंब करण्यात आला. त्यामागील कारण काय ते संबंधित यंत्रणाच जाणे. परंतु यामुळे शौचालयांचे स्वखर्चाने बांधकाम करणारे गोरगरीब लाभार्थी अनेक महिन्यांपर्यंत या योजनेच्या अनुदानापासून वंचित राहतात. याची गावात चर्चा होऊन त्याचा निर्मल भारत अभियानाच्या पुढील उद्दिष्टापूर्तीवर विपरित परिणाम होतो. यावर्षी शौचालयांचे बांधकाम करणार्‍या १0१४६ लाभार्थ्यांपैकी ३३५३ लाभार्थ्यांना एक कोटी ५४ लाख २३ हजार ८00 रुपयांच्या अनुदानाच्या धनादेशाचे वितरण मार्चअखेरपर्यंंत करण्यात आले. त्याची टक्केवारी ३३ टक्के होती. त्यानंतर आतापर्यंत आणखी १५६५ लाभार्थ्यांंना ७१ लाख ९९ हजार रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. अशाप्रकारे आतापर्यंंत एकूण शौचालयांचे बांधकाम करणार्‍या १0१४६ लाभार्थ्यांंपैकी ४९१८ लाभार्थ्यांंना दोन कोटी २६ लाख २२ हजार ८00 रुपयांचा धनादेशाचे वाटप करण्यात आले. या अनुदान वाटपाची टक्केवारी केवळ ४८.९५ टक्के एवढी आहे. लाभार्थ्यांंना अनुदान वाटपाबाबत पंचायतस्तरीय व ग्रा.पं. स्तरीय यंत्रणेच्या उदासीनतेमुळे अभियानात शौचालयांचे बांधकाम करूनही तब्बल ५२२८ अर्थात ५१.0५ टक्के लाभार्थी शौचालय बांधकामाबाबत मिळणार्‍या अनुदानापासून अद्यापही वंचित आहे. जिल्हय़ातील कामचुकार ग्रामसेवकांना निलंबित करून यंत्रणेला वठणीवर आणण्यासाठी धडपडणारे जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी अनुदान वाटपास विलंब करणार्‍या संबंधित अधिकार्‍यांना लवकरात लवकर अनुदानाचे वाटप करण्याबाबत देतील काय, असा प्रश्न वंचित लाभार्थी विचारत आहेत.