वाशिम : जिल्हय़ात अचानक ढगाळ वातावरण निर्माण होऊन वादळ वार्यासह गारपीट व जोरदार पाऊस ९ मार्च रोजी झाला. कारंजा, मानोरा व मंगरूळपीर तालुक्यात गारपीट तर वाशिम, रिसोड येथे विजेच्या कडकडाटासह पाऊस बरसला. मालेगाव तालुक्यामध्ये तुरळक पाऊस झाला आहे. वाशिम शहरासह तालुक्यामध्ये संध्याकाळी ७.३0 वाजताच्या दरम्यान अचानक वातावरणात बदल होऊन जोरदार पावसाचे आगमन झाले. वादळ वार्यासह झालेल्या पावसाने विद्युत पुरवठा खंडित झाला होता. पावसाचे आगमन झाल्याने बाजारपेठ बंद होऊन सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. तालु क्यात वादळ-वार्यामुळे काही झाडे उन्मळून पडली असून, फळबागांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. आंब्याचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असल्याने यावर्षी आंबा मिळणे दुरापास्त होणार आहे. कारंजा तालुक्यात सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास वादळी वार्यासह अवकाळी पाऊस व गारपीट झाली. यामध्ये भाजीपाला, गहू, हरभरा, तसेच फळवर्गीय पिकांसह घरांची पडझड झाली. अनेक ठिकाणी मोठमोठे वृक्षही उन्मळून पडले. तालुक्यात सायंकाळी ४ वाजेपर्यंत वातावरण अगदी निरभ्र होते; परंतु सायंकाळी ५ वाजतानंतर एकाएकी आकाशात ढग निर्माण झाले आणि थोड्याच वेळाने वादळी वार्यासह अवकाळी पाऊस व गारपिटीला सुरुवात झाली. कारंजा शहरासह पोहा, शिवनगर, खेर्डा भागाई, विळेगाव, शहा, वालई, जयपूर, वाई गौळ, काळी कारंजा भडशिवणीसह तालुक्यात अनेक गावात वादळी वारा आणि गार िपटीने थैमान घातले. यामध्ये अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली, तसेच मोठमोठे वृक्ष उन्मळून पडले. त्याशिवाय आंबा, संत्रा, केळी, पपई, लिंबू आदी फळपिकांसह गहू, हरभरा, तसेच भाजी पाल्याचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याने बळीराजावरचे आर्थिक संकट अधिकच वाढले आहे. मानोरा तालुक्यात सोमवारी वादळी वार्यासह गारपिटीने थैमान घातले. यामध्ये पिकांचे मोठय़ा प्रमाणा त नुकसान झालेच, शिवाय वृक्ष उन्मळून पडले, घरांची पडझड झाली, तसेच काही ठिकाणी जनावरांचा मृत्यूही झाल्याच्या घटना घडल्या.
वादळी वा-यासह गारपीट
By admin | Updated: March 10, 2015 01:55 IST