शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

वाशिम जिल्ह्यात गारपीटीने २,१०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 15:00 IST

२४ गावांना जबर फटका बसला असून २१०० हेक्टरपेक्षा अधिक शेतजमिनीवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात गुरूवार, २ जानेवारीला गारपीटीसह अवकाळी पावसाने अक्षरश: थैमान घातले. या नैसर्गिक संकटाचा प्रामुख्याने मानोरा तालुक्यातील १७ आणि वाशिम तालुक्यातील ७ अशा २४ गावांना जबर फटका बसला असून २१०० हेक्टरपेक्षा अधिक शेतजमिनीवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे. त्यानुषंगाने कृषी व महसूल विभागाकडून सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे.जिल्ह्यात गतवर्षी आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे २ लाख ५० हजार ३५० शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांचे जबर नुकसान झाले होते. त्यापोटी १७९.९९ कोटी रुपयांचा मदतनिधी शासनाकडून प्राप्त झाला. त्याचे वाटप सद्या बाधीत शेतकऱ्यांना वाटप करण्याची प्रक्रिया सुरू आहे. असे असतानाच पुन्हा एकवेळी २ जानेवारीला गारपीट आणि अवकाळी पावसाने अक्षरश: थैमान घालून रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान केले. जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार मानोरा तालुक्यातील १७ आणि वाशिम तालुक्यातील ७ अशा २४ गावांमधील २१०० हेक्टरवरील पिकांना जबर फटका बसला असून कृषी आणि महसूल विभागाकडून सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे.या नैसर्गिक आपत्तीमुळे प्रामुख्याने गहू, हरभरा, हळद, तूर या पिकांचे नुकसान झाले असून सरासरी उत्पन्नावर त्याचा विपरित परिणाम होणार असल्याचे संकेत शेतकºयांकडून वर्तविण्यात येत आहे.अवकाळी पाऊस, गारपीटीने बाधीत झालेली गावे२ जानेवारीला झालेला अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे वाशिम तालुक्यातील वारा जहाँगीर, देगाव, उमरा, जवळा यासह मानोरा तालुक्यातील वटफळ, रुईगोस्ता, शेंदूरजना, भुली, ढोणी, माहुली, पंचाळा, धानोरा, गादेगाव, सोयजना, मेहा, भुली यासह इतर गावांमधील रब्बी हंगामातील पिकांना जबर फटका बसला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे आधीच आर्थिक अडचणीत सापडलेले शेतकरी अधिकच हतबल झाल्याचे दिसून येत आहे.

वाशिम तालुक्यातील बाधीत सातही गावांमध्ये कृषी सहायकांमार्फत बाधीत पिकांच्या सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. ते पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात झालेल्या नुकसानाचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात येईल.- अभिजित देवगिरीकरतालुका कृषी अधिकारी, वाशिम२ जानेवारीला झालेला अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे प्रामुख्याने मानोरा तालुक्यातील सर्वाधिक १७ आणि वाशिम तालुक्यातील ७ गावांमध्ये पिकांचे नुकसान झाले. उर्वरित मंगरूळपीर, कारंजा, रिसोड आणि मालेगाव या चार तालुक्यांमधील पिके सुस्थितीत आहेत.- शैलेश हिंगेनिवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी