शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हय़ात पुन्हा गारपीट; पिकांसह फळबागांचे अतोनात नुकसान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 02:32 IST

वाशिम: जिल्हय़ात १३ फेब्रुवारी रोजी सर्वत्र सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतकरी पूर्णपणे खचून गेला. गत दोन दिवसांपासून जिल्हय़ात अवकाळी पाऊस व गारपीट होत आहे. १३ फेब्रुवारी रोजी पुन्हा गारपिटीने वाशिम, मालेगाव, रिसोड, मानोरा व मंगरुळपीर तालुक्याला झोडपले. १२ फेब्रुवारीला कारंजात गारपीट झाली होती. गहू, हरभरा यासह फळबागांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून, यामुळे शेतकरी ‘गारद’ झाला आहे.

ठळक मुद्देपेनबोरी येथे गोठा उद्ध्वस्त 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्हय़ात १३ फेब्रुवारी रोजी सर्वत्र सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतकरी पूर्णपणे खचून गेला. गत दोन दिवसांपासून जिल्हय़ात अवकाळी पाऊस व गारपीट होत आहे. १३ फेब्रुवारी रोजी पुन्हा गारपिटीने वाशिम, मालेगाव, रिसोड, मानोरा व मंगरुळपीर तालुक्याला झोडपले. १२ फेब्रुवारीला कारंजात गारपीट झाली होती. गहू, हरभरा यासह फळबागांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून, यामुळे शेतकरी ‘गारद’ झाला आहे.जिल्हय़ात १३ फेब्रुवारी रोजी सर्वत्र सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतकरी पूर्णपणे खचून गेला. गत दोन दिवसांपासून जिल्हय़ात अवकाळी पाऊस व गारपीट होत आहे. १३ फेब्रुवारी रोजी पुन्हा गारपिटीने वाशिम, मालेगाव, रिसोड, मानोरा व मंगरुळपीर तालुक्याला झोडपले. १२ फेब्रुवारीला कारंजात गारपीट झाली होती. गहू, हरभरा यासह फळबागांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून, यामुळे शेतकरी ‘गारद’ झाला आहे.अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकर्‍यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला असून, शेतकर्‍यांना पुन्हा एकदा नैसर्गिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे.गेल्या चार-पाच दिवसांपासून वातावरणात मोठा बदल झाला. रविवारी रिसोड व मालेगाव तालुक्याला गारपिटीने झोडपून काढल्यानंतर सोमवारी कारंजा तालुक्यात गारपीट झाली. मंगळवारी वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर तालुक्यात सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास गारपीट झाली तर रात्री ८.३0 वाजताच्या सुमारास मानोरा तालुक्यातील रूई गोस्ता परिसरात गारपीेट झाली. वाशिम शहरातही सायंकाळी ५ वाजतानंतर अवकाळी पाऊस व गारपीट झाली. दरम्यान, रविवारच्या अवकाळी पाऊस व गारपिटीने जिल्हय़ातील ८,५00 हेक्टरवरील पिकांचे नुकसान केले असून, सर्वेक्षणाचे काम सुरू असतानाच बुधवारी पुन्हा गारपीट झाली. त्यामुळे यापूर्वी सर्वेक्षण झालेल्या गावातही पुन्हा सर्वेक्षण करण्याची वेळ आली आहे. अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतकर्‍यांची एकच धांदल उडाली. वादळी वार्‍यामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याचेही वृत्त आहे. 

वाशिम तालुक्यातही नुकसानवाशिम: बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास वाशिम शहरासह तालुक्यातील काही ठिकाणी अवकाळी पावसासह गारपीट झाल्याने गहू, हरभरा यासह भाजीपाला व फळबागांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. देपूळ, अनसिंग, धानोरा मापारी परिसरात पिकांच्या नुकसानाची तीव्रता अधिक आहे. वाशिम तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे बुधवारपासून केले जातील, अशी माहिती तहसीलदार बलवंत अरखराव यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

मंगरुळपीर तालुक्यात गारपिटीसह अवकाळी पाऊसशहरासह तालुक्यात १३ फेब्रुवारी रोजी विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाल्याने पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. काही ठिकाणी तुरळक प्रमाणात गारपीट झाल्याने शेतकर्‍यांची एकच धांदल उडाली होती.१३ फेब्रुवारी रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकर्‍यांच्या गहू व हरभरा पिकांचे नुकसान झाले असून, काही प्रमाणात भाजीपाला व फळबागांनासुद्धा पावसाचा फटका बसला. आधीच नापिकी व कर्जबाजारीपणा तसेच शेतमालाला नसलेले भाव यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत असून, त्यातच या अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गाच्या अडचणीत वाढ झाली आहे. आर्थिक मदत द्यावी अशी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांची मागणी आहे.

गोवर्धन, किनखेडा, पेनबोरी, मसलापेन येथे गारपीटरिसोड: रविवारी सकाळी व रात्रीच्या सुमारास रिसोड तालुक्यातील २५ ते ३0 गावांना गारपिटीने झोडपून काढले होते. त्यानंतर आता पुन्हा १३ फेब्रुवारी रोजी तालुक्यातील गोवर्धन, किनखेडा, पेनबोरी, मसलापेन, वाडी रायताळ, पळसखेड, मोहजा इंगोले, भोकरखेडा, देगाव, धोडप, वाडीरायताळ यासह १0 ते १५ गावांत गारपीट झाली. गोवर्धन येथे जवळपास १२ ते १५ मिनिटे झालेल्या गारपिटीमुळे शेतकर्‍यांचा हातातील उभ्या पिकांचे होत्याचे नव्हते झाले, अशी माहिती गोवर्धन वाघ, युवा शेतकरी निखिल प्रभाकर वाघ यांनी दिली. किनखेडा येथील रेशीम उत्पादक शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले. पेनबोरी येथे एक गोठा उद्ध्वस्त झाला असून, पिकांचे प्रचंड नुकसान झाले. वाडी रायताळ, पळसखेडा परिसरात माजी पं.स. सभापती सुभाष खरात, तलाठी नरवाडे, ग्रामसेवक देशमाने यांनी सायंकाळी ६ ते ७ या वेळेत पाहणी केली असून, बुधवारी पंचनामे केले जातील, अशी माहिती तहसीलदार राजू सुरडकर यांनी दिली. 

टॅग्स :washimवाशिम