शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
5
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
6
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
7
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
8
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
9
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
10
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
11
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
12
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
13
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
14
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
15
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
16
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
17
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
18
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
19
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
20
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 

हरभरा पिकात वन्यप्राण्यांचा हैदोस; शेतकरी चिंतातुर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:33 IST

२०२० वर्ष शेतकऱ्यांसाठी फारसे लाभदायक ठरले नाही. जून महिन्याच्या सुरुवातीलाच आलेल्या पावसामुळे पेरण्या लवकर उरकल्या होत्या. त्यानंतर पावसाने दडी ...

२०२० वर्ष शेतकऱ्यांसाठी फारसे लाभदायक ठरले नाही. जून महिन्याच्या सुरुवातीलाच आलेल्या पावसामुळे पेरण्या लवकर उरकल्या होत्या. त्यानंतर पावसाने दडी मारल्याने आणि काही ठिकाणी संततधार पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागले. ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसाने मूग, उडीद या पिकांचे अतोनात नुकसान केले. ऑक्टोबरमधील परतीच्या पावसाने सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांना सोयाबीनचा एकरी उतारा दोन ते चार क्विंटलदरम्यान झाला. सोयाबीनला एकरी १५ ते २० हजारांपर्यंत लागवड खर्च येतो. त्यात शेतकऱ्यांचे परिश्रम वेगळे. शेतऱ्यांची सर्व भिस्त सोयाबीन पिकावर होती. खरीप हंगामातील कसर भरून काढण्यासाठी शेतकरी हे रबी हंगामातील पिकांवर भर देत असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात ५० हजार हेक्टरांवर हरभरा पिकाची पेरणी झाली आहे. ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावर विविध किडींचा प्रादुर्भाव झालेला आहे. कीड नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या कीटकनाशकांची फवारणी केली जात आहे. अशातच वन्यप्राण्यांनी धुमाकूळ घालून हरभरा पिकाची नासाडी चालविल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. माकडाचे कळप हे शेतात ठाण मांडून पिकांचे नुकसान करीत असल्याने वन विभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी बुधवारी केली.

००००००

गावस्तरीय समिती करते पाहणी

सरपंच, तलाठी, कृषी सहायक व वन विभागाचा एक कर्मचारी अशा चार जणांची मिळून गावस्तरावर एक समिती असते. शेतकऱ्यांची तक्रार प्राप्त झाल्यास ही समिती पाहणी करते. पिकाचे नुकसान हे वन्यप्राण्यांनी केले की नाही हे ठरविण्यात वन कर्मचाऱ्याची भूमिका महत्त्वाची असते. वन्यप्राण्यांकडून किती प्रमाणात नुकसान झाले, याचा अहवाल वरिष्ठांकडे सादर केला जातो. मंजुरीनुसार शासन नियमानुसार भरपाई देण्यात येते. मात्र, या समितीसंदर्भात बहुतांश शेतकरी अनभिज्ञ असल्याने नुकसानभरपाईसंदर्भात प्रस्तावही नगण्यच येतात.

वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान झाल्यास गावस्तरीय समितीकडून पाहणी केली जाते. प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर शासन नियमानुसार संबंधित शेतकऱ्यांना भरपाई मिळते. - सुमंत सोळंके, उपवनसंरक्षक, वाशिम ००००

खरीप हंगामात अगोदरच अतिवृष्टी व परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना गारद केले आहे. आता वन्यप्राण्यांनी शेतात ठाण मांडून रबी पिकांचे नुकसान चालविले आहे. - गौतम भगत, शेतकरी