शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

गुरूमंदिर संस्थानच्या आर्थिक व्यवहाराची तपासणी ‘फॉरेन्सिक आॅडिटर’मार्फत होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 15:28 IST

कारंजा लाड : कारंजा शहरातील प्रसिध्द गुरूमंदिर संस्थानच्या आर्थिक व्यवहाराची तपासणी करण्यासाठी नागपुर येथील अभिजीत केळकर अ‍ॅड कंपनी या फॉरन्सीक आॅडीटरची नियुक्ती विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : कारंजा शहरातील प्रसिध्द गुरूमंदिर संस्थानच्या आर्थिक व्यवहाराची तपासणी करण्यासाठी नागपुर येथील अभिजीत केळकर अ‍ॅड कंपनी या फॉरन्सीक आॅडीटरची नियुक्ती विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी केली आहे. कारंजा शहर पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्हाच्या अनुषंगाने ही तपासणी पूर्ण होणार आहे. कारंजा येथील समाजसेवक शेखर काण्णव यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपिठात गुरूमंदिर संस्थान विश्वस्तांविरूध्द दाखल केलेल्या याचिकेच्या अनुषंगाने सदर नियुक्ती झाली असल्याची माहिती शेखर काण्णव यांनी १४ जुलै रोजी दिली.सविस्तर असे की, विश्वस्ताच्या विरोधात शहर पोलीस स्टेशन येथे ३१ मे २०१६ रोजी विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हा रद्द करण्यात यावा म्हणुन गुरूमंदीर विश्वस्तांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपिठात याचिका दाखल केली होती. न्यायाधिशांनी २१ नोव्हेंबर २०१७ रोजी सदर अर्ज नांमजुर करून खारीज केला होता. त्यामुळे पोलीस तपासातील स्थगनादेश दुर झाला. तक्रारकर्ते शेखर काण्णव यांच्या अर्जानुुसार सदर प्रकरण आर्थिक गुन्हा शाखा वाशिम यांच्याकडे तपासण्याकरीता वर्ग करण्यात आले. काण्णव यांनी तक्रारीमधील सर्व अंकेक्षण अहवालाचे पुनर्लेखांकन करून घेण्याची मागणी केली होती. १ डिसेंबर २०१६ च्या शासन निर्णयान्वये आर्थीक गुन्हे प्रकरण तपासकामी सरकारमान्य फॉरेन्सीक आॅडीटर फर्मची नियुक्ती करणे गरजचे होते. जानेवारी, डिसेंबर २०१८ च्या कालावधीत काण्णव यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती, पोलीस अधिक्षक तथा उपअधिक्षक वाशिम यांना ७ लेखी पत्रे दिली. पुराव्याचे नविन दत्तावेज तयार केले. तरी सुध्दा पोलीस प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने काण्णव यांनी १८ जानेवारी २०१९ रोजी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात वैयक्तीकरीत्या फौजदारी रिट अर्ज दाखल केला. त्यानुसार उपविभागीय अधिकारी रमेश सोनुने यांचे पत्रानुसार अभिजीत केळकर नागपुर या फॉरेन्सीक आॅडीटरची नियुक्ती करण्यात आली, अशी माहिती शेखर काण्णव यांनी दिली. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय होते याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

आमचा या ‘फॉरेन्सिक आॅडिट’सोबत काही संबंध येत नाही. या संदर्भात आम्हाला काही कल्पना नाही- प्रकाश घुडे,विश्वस्तगुरुमंदिर संस्थान, कारंजा लाड

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजा