शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

 हागणदारीमुक्त ग्रामपंचायतींच्या दुसऱ्या पडताळणीसाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 15:40 IST

केंद्रशाासनाच्यावतिने हागणदारीमुक्त झालेल्या ग्रामपंचायतींची दुसºया टप्प्यातील पडताळणी प्रक्रीया निश्चित करण्याचे निर्देश दिले होते.

वाशिम : राज्यातील हागणदारीमुक्त झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये , निर्माण झालेल्या स्वच्छता सुविधांचा कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी वापर करणे, स्वच्छता सुविधांची शाश्वतता अबाधित ठेवणे आवश्यक आहे. याकरिता केंद्रशाासनाच्यावतिने हागणदारीमुक्त झालेल्या ग्रामपंचायतींची दुसºया टप्प्यातील पडताळणी प्रक्रीया निश्चित करण्याचे निर्देश दिले होते. केंद्र शासनाने दिलेले निर्देशानुसार पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने १८ जुलै रोजी काही मार्गदर्शक सूचना निर्ममित केल्या आहेत.हागणदारीमुक्त झालेल्या ग्रामपंचायतींची दुसºया टप्प्यातील पडताळणी प्रक्रीयेमध्ये , ग्रामपंचायतमधील शाहा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, सार्वजनिक ठिकाणे व सर्व कुटुंबाची स्वच्छतेच्या अनुषंगाने पडताळणी करणे या बाबीचा समावेश असेल. याकरिता जिल्हा स्तरावरुन प्रत्येक गावाकरिता समिती गठित करण्यात येणार आहे. समिती गठित करण्याचे अधिकार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे आहेत. प्रत्येक समितीमध्ये(गावातील लोकसंख्येनुसार) २ ते ६ सदस्यांचा समावेश असेल. पडताळणी प्रक्रीयेत प्राथमिक पडताळणी समिती व फेर पडताळणी समिती अशा दोन प्रकारच्या समित्या राहणार आहेत. या पडताळणीची प्रक्रीया शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून १० दिवसाच्या कालावधीमध्ये करावी लागणार असून त्यामध्ये यासंबधित प्रशिक्षणाचाही समावेश आहे. येत्या १० आॅगस्ट पर्यंत सर्व कामे पूर्ण करावे लागणार आहेत.बॉक्स---प्राथमिक पडताळणी समितीमध्ये राहणार यांचा समावेशकेंद्रप्रमुख, अंगणवाडी पर्यवेक्षिका, संबधित ग्रामपंचायतमधील एक अंगणवाडी सेविाका, मुख्याध्यापक अथवा त्यांचे प्रतिनिधी, ग्रामपंचायतमधील एक स्वच्छाग्रही , ग्रामीण पाणी पुरवा व स्वच्छता समिती सदस्य, आशासेविका, महिला बचत गट सदस्या, जलसुरक्षक इत्यादी पैकीच सहा सदस्य राहतील. फेरपडताळणी समितीमध्ये राहणार यांचा समावेशप्राथमिक पडताळणी समितीने पडताळणी पूर्ण केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी प्रत्येक तालुक्याकरिता उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) यांच्या अध्यक्षतेखाली फेरपडताळणी समिती राहिल. यामध्ये जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील संबधित तालुक्याचे समन्वयक, विभाग प्रमुख, विस्तार अधिकारी दर्जाचे अधिकारी, गट संसाधन केंद्र/समूह संसाधन केंद्र यांचा समावेश असेल. 

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायत