शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पुरवठा योजनेच्या कामाला जीएसटीचा खोडा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 16:09 IST

मालेगाव: शहराला कायमस्वरूपी पाणी पुरवठा करण्याच्या उद्देशाने नगर पंचायतकडून चाकातिर्थ प्रकल्पाद्वारे नळ योजनेतून पाणी पुरवठ्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आणि या पाणी पुरवठा योजनेच्या कामाचे कंत्राटही देण्यात आले आणि त्याचे अंदाजपत्रकही तयार करण्यात आले; परंतु आता जीएसटीमुळे खर्चात वाढ होणार असल्याने संबंधित कंत्राटदार कं पनीला नव्याने अंदाजपत्रकासह प्रस्ताव तयार करावा ...

ठळक मुद्देनव्या अंदाजपत्रकाची गरज मालेगाव शहराला जाणवणार भीषण पाणीटंचाई

मालेगाव: शहराला कायमस्वरूपी पाणी पुरवठा करण्याच्या उद्देशाने नगर पंचायतकडून चाकातिर्थ प्रकल्पाद्वारे नळ योजनेतून पाणी पुरवठ्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आणि या पाणी पुरवठा योजनेच्या कामाचे कंत्राटही देण्यात आले आणि त्याचे अंदाजपत्रकही तयार करण्यात आले; परंतु आता जीएसटीमुळे खर्चात वाढ होणार असल्याने संबंधित कंत्राटदार कं पनीला नव्याने अंदाजपत्रकासह प्रस्ताव तयार करावा लागणार असल्याने या योजनेचे काम रखडले आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्याही मालेगाव शहराला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. 

मालेगाव शहराची लोकसंख्या ३० हजारांच्या घरात असून, या शहराला कुरळा आणि सुकांडा धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतो; परंतु या धरणाचा पाणीसाठा वर्षभर पुरत नसल्याने शहरातील नागरिकांना दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसांत भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन मालेगाव नगर पंचायतकडून चाकातिर्थ प्रकल्पावरून पाणी पुरवठा योजना प्रस्तावित करण्यात आली. या कामाचे कंत्राटही देण्यात आले आणि संबंधित कंत्राटदाराकडून या प्रकल्पावरून नळ योजनेद्वारे पाणी पुरवठ्यासाठी पाईपलाईनसह जलकुंभाच्या उभारणीसाठी सर्व्हेही करण्यात आला आणि सदर योजनेचे अंदाजपत्रक तयार करून संबंधित विभागाकड मान्यतेसाठी पाठविण्यात आले. त्यामुळे या योजनेचे काम आता लवकर सुरू होणार असे वाटू लागले; परंतु शासनाने जीएसटी लागू केल्यानंतर या कामावरील खर्चात वाढ होणार असून, सदर कंत्राटदाराला नव्याने अंदात पत्रक तयार करून प्रस्ताव सादर करावा लागणार आहे. त्यामुळे या कामाला आणखी विलंब लागणार असल्याने मालेगाववासियांना यंदाही उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे. 

टॅग्स :Waterपाणी