शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

बीज प्रक्रिया संयंत्रासाठी मिळणार १० लाख रुपयांचे अनुदान; वाशिम जिल्ह्याला केवळ एक लक्ष्यांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 16:02 IST

वाशिम : कृषी विभागामार्फत सन २०१७-१८ या वर्षात राबविण्यात येणाऱ्या  उन्नत शेती, समृद्ध शेतकारी मोहिमेंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान-कडधान्य या योजनेंतर्गत बीज प्रक्रिया संयंत्रासाठी शेतकरी उत्पादक संघ किंवा शेतकरी उत्पादक कंपनीला १० लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे.

ठळक मुद्देशेतीला जोडधंदा म्हणून शासनातर्फे शेतकरी उत्पादक संघ किंवा शेतकरी उत्पादक कंपनीला काही अटी व शर्तीच्या अधीन राहून अनुदान दिले जाते. शासनातर्फे बीज प्रक्रिया प्रकल्प उभारणीसाठी प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के किंवा १० लाख रुपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान दिले जाते.सन २०१७-१८ या वर्षात वाशिम जिल्ह्याला केवळ एक लक्ष्यांक प्राप्त झालेला आहे.

वाशिम : कृषी विभागामार्फत सन २०१७-१८ या वर्षात राबविण्यात येणाऱ्या  उन्नत शेती, समृद्ध शेतकारी मोहिमेंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान-कडधान्य या योजनेंतर्गत बीज प्रक्रिया संयंत्रासाठी शेतकरी उत्पादक संघ किंवा शेतकरी उत्पादक कंपनीला १० लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे. वाशिम जिल्ह्याला केवळ एक बीज प्रक्रिया संयंत्राचा लक्ष्यांक प्राप्त असून, पात्र लाभार्थींनी ५ मार्च २०१८ पर्यंत संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले.

शेतीला जोडधंदा म्हणून शासनातर्फे शेतकरी उत्पादक संघ किंवा शेतकरी उत्पादक कंपनीला काही अटी व शर्तीच्या अधीन राहून अनुदान दिले जाते. शेतकरी उत्पादक संघ हे मोठ्या संख्येने बीज प्रक्रिया उद्योगाकडे वळत असल्याने शासनातर्फे बीज प्रक्रिया प्रकल्प उभारणीसाठी प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के किंवा १० लाख रुपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान दिले जाते. सन २०१७-१८ या वर्षात वाशिम जिल्ह्याला केवळ एक लक्ष्यांक प्राप्त झालेला आहे. इच्छूक शेतकरी उत्पादक संघ, शेतकरी उत्पादक कंपनीची संख्या आणि लक्ष्यांक लक्षात घेता स्पर्धा निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. १० लाख रुपये अनुदान किंवा  बीज प्रक्रिया प्रकल्प उभारणी करण्यासाठी यंत्रसामुग्री व बांधकामासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के अनुदान दिले जाणार आहे. उर्वरीत खर्च हा शेतकरी उत्पादक संघ किंवा उत्पादक कंपनीला करावा लागणार आहे. ही बाब बँक कर्जाशी  निगडीत असून शेतकरी उत्पादक संघ अथवा शेतकरी उत्पादक कंपनीला बँकेकडे प्रकल्प सादर करावा लागणार आहे. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर संबंधित शेतकरी उत्पादक संघ अथवा कंपनी सदर अनुदानास पात्र राहणार आहे. इच्छुक शेतकरी उत्पादक संघ अथवा शेतकरी उत्पादक कंपनीने संबंधित तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे ५ मार्च २०१८ पर्यंत अर्ज सादर करावा. लक्ष्यांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयात ७ मार्च २०१८ रोजी सकाळी ११ वाजता लॉटरी पद्धतीने लाभार्थी निवड करण्यात येईल, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गावसाने यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्र