शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकांचे आंदोलन : आॅगस्ट महिन्यात एकही ग्रामसभा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 16:16 IST

आॅगस्ट महिन्यातही एकही मासिक सभा तसेच ग्रामसभा झाली नसल्याने गावविकासाला खिळ बसली.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : प्रलंबित मागण्यांकडे शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामसेवक संघटनेने जिल्ह्यात ९ जुलैपासून असहकार आंदोलन तर २२ आॅगस्टपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे आॅगस्ट महिन्यातही एकही मासिक सभा तसेच ग्रामसभा झाली नसल्याने गावविकासाला खिळ बसली.ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी पद रद्द करून पंचायत विकास अधिकारी पद निर्मिती करणे, वेतन त्रूटी दूर करणे, जूनी पेन्शन योजना लागू करणे, अतिरिक्त कामे कमी करणे, निलंबित केलेल्या ग्रामसेवकांना ९० दिवसांच्या आत सेवेत घेण्यात यावे यासह अन्य मागण्यांकडे शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामसेवक संघटनेने विविध ट्प्प्यात आंदोलन केले. परंतू, शासनाने या आंदोलनाची दखल घेतली नाही. त्यामुळे अधिक आक्रमक होत ग्रामसेवक संघटनेने असहकार,  धरणे आंदोलन, मोर्चा आणि २२ आॅगस्टपासून कामबंद केले. त्यामुळे गावपातळीवरील कामकाज ठप्प झाले आहे. दप्तर कुलूपबंद करून त्याच्या चाव्या सर्व ग्रामसेवकांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांकडे सोपविल्या. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्यावर ग्रामसेवक संघटना ठाम आहे.  यामुळे गाव विकासाला खिळ बसली आहे. शिवाय आॅगस्ट महिन्यातील ग्रामसभाही सचिवांच्या अनुपस्थितीमुळे स्थगित कराव्या लागल्या. आॅगस्ट महिन्यातील ग्रामसभेत विशेषत: तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष निवडीचा विषय चर्चेला येत  असल्याने या ग्रामसभेला ग्रामपातळीवर विशेष महत्व असते. परंतु आॅगस्ट महिन्यात १५ आॅगस्ट रोजी तालुक्यातील काही मोजक्याच ग्राम पंचायतमध्ये ग्रामसभा घेण्यात आल्या. तर अनेक ग्राम पंचायतीत कोरम अभावी त्या स्थगित करून बहुतांश ग्रामपंचायतीत २९ आॅगस्ट रोजी ग्रामसभेचे आयोजन केले होते. परंतु सदर ग्रामभेस ग्रामसचिवच उपस्थित नसल्याने याही ग्रामसभा स्थगित कराव्या लागल्या. त्यामुळे शासनाने वरिष्ठ पातळीवर ग्रामसेवकांच्या मागण्याविषयी ठोस निर्णय घेऊन ग्रामविकासाला बसलेली खिळ थांबवावी अशी मागणी ग्रामवासियातून केल्या जात आहे.  जिल्हाभरातील ग्रामसभा, मासिक सभा प्रभावितग्रामसेवकांचे आंदोलन सुरू असल्याने जिल्हाभरातील ग्रामसभा, मासिक सभा प्रभावित झाल्या आहेत. कारंजा तालुक्याप्रमाणेच वाशिम, रिसोड, मानोरा, मंगरूळपीर व मालेगाव तालुक्यातील ग्रामसभा, मासिक सभा होत नसल्याने गाव विकासात खोळंबा निर्माण झाला.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजाgram panchayatग्राम पंचायत