शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचांनी ‘सील’ केलेले पार्डी तिखे ग्रामपंचायतच्या कपाटाचे कुलूप उघडले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 16:14 IST

वाशिम : रिसोड तालुक्यातील पार्डी तिखे ग्रामपंचायतच्या रेकॉर्ड गायब प्रकरणी सरपंचांनी ग्रामपंचायतीमधील कपाट ‘सील’ केले होते. याप्रकरणाची दखल घेत रिसोड पंचायत समिती प्रशासनाने ग्रामसेवकाचा प्रभार तडकाफडकी काढून टाकला.

ठळक मुद्देग्रामपंचायतमधील कपाटातून बँकेचे पासबुक, चेकबुक, प्रोसेडींग बुक, अर्धवट स्वाक्षºया असलेली कागदपत्रे, स्टँम्प आदी साहित्य गायब झाले. महत्वाचे ‘रेकॉर्ड’ गायब झाल्याची तक्रार पार्डी तिखे (ता.रिसोड) येथील गटग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच शेषराव दगडू अंभोरे यांनी रिसोड पंचायत समितीकडे केली होती. रिसोड पंचायत समिती प्रशासनाने ग्रामसेवकाचा प्रभार तडकाफडकी काढून टाकला.

वाशिम : रिसोड तालुक्यातील पार्डी तिखे ग्रामपंचायतच्या रेकॉर्ड गायब प्रकरणी सरपंचांनी ग्रामपंचायतीमधील कपाट ‘सील’ केले होते. याप्रकरणाची दखल घेत रिसोड पंचायत समिती प्रशासनाने ग्रामसेवकाचा प्रभार तडकाफडकी काढून टाकला.तसेच कपाटाला लावलेले कुलूपही सरपंच व सदस्यांच्या उपस्थितीत काढण्यात आले. दरम्यान, २६ जानेवारीपासून नवीन ग्रामसेवकांनी प्रभार स्विकारला.

१४ व्या वित्त आयोगांतर्गत ग्रामपंचायतीला मिळालेल्या निधीमध्ये अनियमितता झाल्याने ग्रामसेवकाविरूद्ध कारवाईचे संकेत पंचायत राज समितीच्या पथकाने दिले होते. मात्र, कारवाईची धार कमी करण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायतीमधील महत्वाचे ‘रेकॉर्ड’ गायब झाल्याची तक्रार पार्डी तिखे (ता.रिसोड) येथील गटग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच शेषराव दगडू अंभोरे यांनी रिसोड पंचायत समितीकडे केली होती. पंचायत राज समितीच्या पथकाने १४ व्या वित्त आयोगांतर्गतच्या निधीची माहिती जाणून घेतली असता, त्यात अनियमितता झाल्याचे आढळून आले होते. त्यामुळे संबंधित ग्रामसेवकाविरूद्ध कारवाई प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती आहे.  दरम्यान, या कारवाईची धार कमी करण्याचा प्रयत्न सद्या सुरू असून ग्रामपंचायतमधील कपाटातून बँकेचे पासबुक, चेकबुक, प्रोसेडींग बुक, अर्धवट स्वाक्षºया असलेली कागदपत्रे, स्टँम्प आदी साहित्य गायब झाले.  ही बाब लक्षात आल्यानंतर सरपंच शेषराव अंभोरे यांनी तडकाफडकी ग्रामपंचायतीमधील कपाटाला सील ठोकून गटविकास अधिकारी अथवा नव्याने रुजू होणाºया ग्रामसेवक आणि पंचाच्या समक्षच सील उघडले जावे, असा पवित्रा घेतला होता. याची दखल घेत पंचायत समिती प्रशासनाने २५ जानेवारी सायंकाळी रिसोड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी (पंचायत) पी.डी. लोखंडे यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायतमधील ‘सील’ केलेले कपाट उघडण्यात आले. यावेळी ग्रामसेवक आर.एस. शिंदे यांचा प्रभार काढून एस.के. काठोळे नामक ग्रामसेवकांकडे सोपविण्यात आला. प्रभार हस्तांतरण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतमध्ये संगणक संच तसेच विद्युत मीटरही आढळून आले नाही. ग्रामपंचायतचे पासबुक व चेकबुक ग्राम सचिवांच्या बॅगमध्ये असल्याचे दिसून आले, अशी नोंद विस्तार अधिकारी लोखंडे यांनी घेतली आहे. 

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायत