शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पार्डी तिखे येथील ग्रामपंचायतमधील गैरप्रकार पोहोचला विधिमंडळात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 17:42 IST

वाशिम - पार्डी तिखे ता. रिसोड येथील ग्रामपंचायतमधील १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतील गैरप्रकार तसेच कागदपत्र गायब प्रकरण विधिमंडळात पोहोचले आहे.

ठळक मुद्दे थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचाकडे कार्यभार हस्तांतरीत करण्यास प्रचंड दिरंगाई झाली. तत्कालिन सरपंचाच्या बोगस स्वाक्षरी करून १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून काही रक्कम काढण्यात आली.

वाशिम - पार्डी तिखे ता. रिसोड येथील ग्रामपंचायतमधील १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतील गैरप्रकार तसेच कागदपत्र गायब प्रकरण विधिमंडळात पोहोचले आहे. दरम्यान, सन २०१८-१९ च्या अर्थसंकल्पीय मागण्यांवरील विधानसभा अध्यक्षांनी मान्य केलेल्या कपात सूचनांच्या यादीत १९ मार्च रोजी पार्डी तिखे येथील उपरोक्त प्रकरण समाविष्ठ असल्याने याप्रकरणी काय कारवाई होते, याकडे लक्ष लागून आहे.

पार्डी तिखे येथे आॅक्टोबर-नोव्हेंबर २०१७ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचाकडे कार्यभार हस्तांतरीत करण्यास प्रचंड दिरंगाई झाली. तसेच तत्कालिन सरपंचाच्या बोगस स्वाक्षरी करून १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून काही रक्कम काढण्यात आली. यासह विविध गैरप्रकार प्रकरणी नवनिर्वाचित सरपंच शेषराव अंभोरे यांनी पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. त्या अनुषंगाने चौकशी होऊन संबंधितांविरूद्ध कारवाई होणे अपेक्षीत होते. मात्र, कारवाई न झाल्याने पार्डी तिखे ग्रामपंचायतमधील उपरोक्त प्रकरण आमदार संजय शिरसाट (औरंगाबाद), आमदार सुनिल प्रभु (मुंबई), आमदार ज्ञानराज चौगुले (उस्मानाबाद), आमदार नागेश पाटील, आमदार सुभाष साबने (बिलोली) आदींनी लक्षवेधीच्या माध्यमातून विधिमंडळात पोहोचविले.  आणि सन २०१८-१९ च्या अर्थसंकल्पीय मागण्यांवरील विधानसभा अध्यक्षांनी मान्य केलेल्या कपात सूचनांच्या यादीत पार्डी तिखे येथील या प्रकरणाचा समावेश आहे. गट ग्रामपंचायत पार्डी तिखे येथील नवनिर्वाचित सरपंचांची निवड होऊनसुद्धा कार्यभार हस्तांतरण न करणे, बँकेचे व्यवहाराची कोणतीही माहिती न देणे, बोगस स्वाक्षरीच्या आधारे १४ व्या वित्त आयोगामधून लाखो रुपये काढणे, ग्रामपंचायतमध्ये संगणक नसतानादेखील संगणक आॅपरेटरच्या नावाने पैसे काढल्याचे निदर्शनात येऊनही वरिष्ठ स्तरावरून कोणतीच कार्यवाही झाली नसल्याचे नमूद करण्यात आले. वरिष्ठांना विनंती करूनही दुर्लक्ष झाल्याने सर्व संबंधितांविरूद्ध शासन निर्णय ग्रामविकास दि . ९ जानेवारी,२०१४ नुसार कारवाई करावी, अशी मागणी उपरोक्त आमदारांनी केली. याप्रकरणी नेमकी काय कारवाई होते, याकडे लक्ष लागून आहे.

टॅग्स :washimवाशिम