शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

ग्राम पंचायत स्तरावर आठ हजार दिव्यांगांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 13:34 IST

वाशिम : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे राबविण्यात आलेल्या विशेष नोंदणी मोहिमेत ग्रामपंचायत स्तरावर आठ हजारांपेक्षा अधिक दिव्यांगांची नोंदणी झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे राबविण्यात आलेल्या विशेष नोंदणी मोहिमेत ग्रामपंचायत स्तरावर आठ हजारांपेक्षा अधिक दिव्यांगांची नोंदणी झाली आहे. दिव्यांगांच्या विविध योजनांसाठी स्वनिधीतील पाच टक्के निधी राखीव ठेवला जाणार आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्वनिधीतील पाच टक्के निधी दिव्यांगांसाठी खर्च करणे अपेक्षित आहे. हा निधी दिव्यांगांसाठी  खर्च व्हावा यासाठी ग्रामपंचायत स्तरावर दिव्यांगांची नोंदणी आवश्यक आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी ग्रामपंचायत स्तरावर दिव्यांगांची नोंदणी होण्यासाठी विशेष नोंदणी मोहिम राबविण्याचे निर्देश समाजकल्याण विभागासह पंचायत विभागाला दिले होते. त्याअनुषंगाने मोहिम राबविली असून, आठ हजारांपेक्षा अधिक दिव्यांगांची नोंदणी झाली आहे, अशी माहिती समाजकल्याण अधिकारी सुनील खमितकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.दिव्यांग बांधवांसाठी पाच टक्के निधी राखीव असला तरी हा निधी पुर्णत: दिव्यांगबांधवांच्या कल्याणासाठी खर्च होत नाही, असा आरोप करीत यापूर्वी विविध सामाजिक संघटनांनी विविध टप्प्यात आंदोलने केली होती. दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी हा निधी खर्च व्हावा म्हणून नोंदणी करण्यात आली आहे. ज्यांची नोंदणी झाली नसेल, त्यांनी तातडीने ग्रामपंचायतमध्ये नोंंदणी करावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांनी केले.स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्वनिधीतील पाच टक्के निधी हा दिव्यांग बांधवांना झेरॉक्स मशीन, बे्रल लेखन साहित्य, ब्रेल टाईपरायटर, श्रवणयंत्रे, शैक्षणिक संच, संवेदन उपकरणे, व्हीलचेअर, तीनचाकी सायकल, कृत्रिम अवयव यासह अन्य वैयक्तिक योजनांसाठी तसेच सामुहिक योजनांमध्ये अपंग पुनर्वसन केंद्र, थेरपी सेंटर सुरू करणे, सार्वजनिक ठिकाणी दिव्यांगांसाठी रॅम्प्स, रेलिंग, स्वच्छतागृह,  दिव्यांगांच्या स्वयंसहाय्यता गटांना अनुदान देणे, उद्योजकता, कौशल्य विकास प्रशिक्षण  आयोजित करणे यासह विविध योजनांचा लाभ मिळणे अपेक्षीत आहे.

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायत