शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या मुलीचे ग्रामपंचायतने केले कन्यादान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 11:30 IST

Washim News : वधू पित्याची भूमिका ठाणेदार शिशिर मानकर यांनी तर पंचायत विस्तार अधिकार संजय भगत यांनी मामाचे कर्तव्य पार पाडले. 

- माणिक डेरेलोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : आई-वडिलाचे छत्र हरवलेल्या मुलीचे कन्यादान करून, कारखेडा ग्रामपंचायतने एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. वधू पित्याची भूमिका ठाणेदार शिशिर मानकर यांनी तर पंचायत विस्तार अधिकार संजय भगत यांनी मामाचे कर्तव्य पार पाडले. आई-वडिलाचे छत्र हरवलेल्या अनाथ मुलीचा विवाह कारखेडा ग्रामपंचायतने मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पार पडला. कारखेडा येथील रहिवासी दीक्षा गजानन डाखोरे या मुलीच्या आई-वडिलांचे निधन झाल्याने, कारखेडा ग्रामपंचायतने हे कुटुंब दत्तक घेतले होते. कुटुंबाचे पालनपोषणासह संपूर्ण नियोजन करण्याची जबाबदारी घेतली होती.  ३१ मे रोजी दीक्षाचा विवाह नांदेड जिल्हातील माहूर तालुक्यातील पडसा या गावातील निखिल गावंडे या युवकाशी जुळल्याने गावच्या सरपंच सोनाली बबनराव सोळंके यांनी  ग्रामपंचायतचा  रीतसर ठराव घेऊन, दीक्षाच्या लग्नाचा रीतसर खर्च उचलला. तिला आई-वडील नसल्यामुळे प्रशासनाचा या विवाह सोहळ्यात सहभाग घेण्यात आला. वधू पित्याची भूमिका मानोरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिशिर मानकर यांनी घेऊन, रीतसर व्याहीभेट स्वीकारून मुलीचे कन्यादान सहपत्नीक केले, तर मामाचे सोपस्कार पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संजय भगत यांनी  पार पाडले. विस्तार अधिकारी सतीश नायसे यांनीही कन्यादान कार्यक्रमात सहभाग नोंदविला. गावच्या सरपंच सोनाली सोळंके यांनी निराधार मुलीचे कन्यादान व सोयरपण प्रशासनाने स्वीकारल्याने हा विवाह सोहळा प्रेरणा देणारा ठरला, असे मत व्यक्त केले. यावेळी उपसरपंच अनिल सीताराम काजळे, ग्रामसेवक अनिल सूर्य,  तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रदीप देशमुख,  पोलीस पाटील वासुदेव सोनोने,  जि.प. शिक्षक रणजीत जाधव,  ग्रामपंचायत सदस्या चैताली विवेक परांडे,  वर्षा मोहन देशमुख,  प्रमिला राजू चव्हाण,  गणेश जाधव, मनोज किशोर तायडे, बाळू जाधव यांची उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायत