शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आकांक्षित जिल्हयातील ग्राम पंचायत इमारतींचा अहवाल मागविला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 14:53 IST

वाशिम : राज्यातील वाशिमसह चार आकांक्षित जिल्ह्यातील स्वतंत्र इमारती नसलेल्या ग्राम पंचायतींचा अहवाल राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान, पुणे येथील राज्य प्रकल्प व्यवस्थापन कक्षाने २ मे रोजी मागितला आहे.

- संतोष वानखडेवाशिम : राज्यातील वाशिमसह चार आकांक्षित जिल्ह्यातील स्वतंत्र इमारती नसलेल्या ग्राम पंचायतींचा अहवाल राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान, पुणे येथील राज्य प्रकल्प व्यवस्थापन कक्षाने २ मे रोजी मागितला आहे. त्यानुसार वाशिम जिल्हा परिषदेने ९७ ग्राम पंचायतींना स्वतंत्र इमारत नसल्याचा अहवाल ४ मे सादर केला. स्वतंत्र इमारतीसाठी ग्राम पंचायतींना निधी मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.गावपातळीवरील प्रत्येक शासकीय कार्यालयाला स्वमालकीची जागा आणि स्वतंत्र इमारत असणे अपेक्षीत आहे. मात्र, अद्याप राज्यभरातील अनेक ग्रामपंचायतींना स्वमालकीची जागा असूनही स्वतंत्र इमारती नाहीत. त्यामुळे भाडेतत्वावरील तसेच पुरेशा प्रमाणात सुविधा उपलब्ध नसलेल्या इमारतीत ग्रामपंचायत कार्यालये थाटण्यात आली आहेत. वाशिम जिल्ह्यातही जवळपास ९७ ग्रामपंचायतींना स्वमालकीची जागा आहे; मात्र स्वतंत्र इमारत नाही. केंद्र सरकारच्या निधी आयोगांतर्गत आकांक्षित जिल्ह्याच्या यादीत वाशिमसह नंदुरबार, गडचिरोली, उस्मानाबाद या चार जिल्ह्यांचा समावेश आहे. या आकांक्षित जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना स्वतंत्र इमारत उपलब्ध करून देण्याच्या हालचाली शासनस्तरावर सुरू असल्याची विश्वसनीय माहिती आहे. त्याअनुषंगाने राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत महत्वाकांक्षी जिल्ह्यातील स्वत:ची इमारत नसलेल्या ग्रामपंचायतींचा अहवाल राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान, पुणे येथील राज्य प्रकल्प व्यवस्थापन कक्षाने २ मे रोजी मागविला आहे. शासनाच्या विविध योजना व इतर उपक्रमांमधून काही ग्राम पंचायतींना इमारत बांधकामे मंजूर झालेली आहेत. अशा इमारत मंजूर असलेल्या ग्रामपंचायती वगळून अद्याप ज्या ग्रामपंचायतींना इमारत बांधकाम मंजूर झालेले नाही व बांधकामासाठी स्वमालकीची जागा उपलब्ध आहे, अशा ग्राम पंचायतींच्या नावांची तालुकानिहाय यादी मागविली आहे. राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत (आरजीएसए) ग्राम पंचायतींच्या इमारत बांधकामांना मंजूरी देण्याची बाब विचाराधीन असून, त्यानुषंगाने हा अहवाल मागविण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. त्यानुसार या चारही जिल्ह्यातून स्वमालकीची इमारत नसलेल्या ग्राम पंचायतींचा अहवाल पाठविण्यात आला आहे. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील ९७, नंदूरबार ४२, गडचिरोली ४३ आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील ५१ अशा ग्राम पंचायतींचा समावेश आहे. स्वमालकीची जागा असलेल्या; परंतू स्वमालकीची इमारत नसलेल्या ग्राम पंचायतींचा अहवाल मागविण्यात आला होता. त्यानुसार वाशिम जिल्ह्यातील ९७ ग्राम पंचायतींचा अहवाल पाठविण्यात आला आहे.- नितीन माने,उपमुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद वाशिम.

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायत