शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

'रोहयो'मधून ग्रामपंचायत भवन, सार्वजनिक शौचालयही साकारणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 17:54 IST

या कामांचा सन २०२०-२१ च्या पुरक लेबर बजेटमध्ये समावेश करण्याच्या सूचना नियोजन विभागाने (रोहयो) ५ आॅगस्ट रोजी जिल्हास्तरीय यंत्रणेला दिल्या.

वाशिम : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत यापूर्वी मंजूर नसलेली काही नवीन कामेही आता घेता येणार आहेत. यामध्ये ग्राम पंचायत भवन आणि सार्वजनिक शौचालय बांधकामावा समावेश केला असून, या कामांचा सन २०२०-२१ च्या पुरक लेबर बजेटमध्ये समावेश करण्याच्या सूचना नियोजन विभागाने (रोहयो) ५ आॅगस्ट रोजी जिल्हास्तरीय यंत्रणेला दिल्या.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये सन २००५ पासून केली जात आहे. मागेल त्याला काम उपलब्ध करून देणे, या कामातून सामुहिक तसेच वैयक्तिक पायाभूत सुविधा उपलब्ध करणे आदी प्रमुख उद्दिष्टे या योजनेतून साध्य करण्याला प्राधान्य दिले जाते. सन २०२१-२२ या वर्षातील लेबर बजेट तयार केले जाणार आहे. या बजेटमध्ये यापूर्वी मंजूर नसलेली; परंतू आता घेण्यासारख्या कामांचा समावेश करता येणार आहे. ग्रामीण भागात अनेक ग्रामपंचायतींना स्वत:ची इमारत नाही. अशा ग्रामपंचायतींचा कारभार भाडेतत्वावरील इमारतीत सुरू आहे तसेच जास्त लोकसंख्येच्या गावात सार्वजनिक शौचालयाचा अभाव आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जेथे आवश्यकता असेल तेथे ग्रामपंचायत भवन तसेच सार्वजनिक शौचालय बांधकामाचा समावेशही करता येणार आहे. सन २०२०-२१ चे पूरक बजेट तयार करताना आवश्यक तेथे ग्रामपंचायत भवन, सार्वजनिक शौचालय बांधकामाचा समावेश करण्याच्या सूचना नियोजन विभागाने (रोहयो) जिल्हास्तरीय यंत्रणेला दिल्या. त्यानुसार अमरावती विभागात ग्रामपंचायत भवन, सार्वजनिक शौचालय बांधकामाचा समावेश २०२०-२१ च्या पुरक बजेटमध्ये करावा, अशा सूचना ग्रामपंचायतींना देण्यात आल्या. वाशिम जिल्ह्यातही पुरक बजेटमध्ये आवश्यकतेनुसार ग्रामपंचायत भवन, सार्वजनिक शौचालय बांधकामाचा समावेश केला जाणार आहे.

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायतgovernment schemeसरकारी योजना