शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. निवडणूक : तिकीट वाटपात प्रमुख राजकीय पक्षांची लागणार कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 14:47 IST

तिकीट वाटपात प्रमुख राजकीय पक्षांची कसोटी लागणार असून भाजपासह काँग्रेस, रा.काँ. शिवसेना व वंचित बहुजन आघाडीच्या भुमिकेकडे ग्रामीण भागातील मतदारांचे लक्ष लागले आहे.

- सुनील काकडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात आरक्षणाची स्थिती ‘जैसे थे’ ठेऊन ठरलेल्या तारखेलाच निवडणूक घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने १८ डिसेंबरला दिला. यामुळे इच्छूक उमेदवारांसह सर्वच राजकीय पक्षांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आता ५२ जिल्हा परिषद गट व १०४ पंचायत समिती गणांमध्ये तिकीट वाटपात प्रमुख राजकीय पक्षांची कसोटी लागणार असून भाजपासह काँग्रेस, रा.काँ. शिवसेना व वंचित बहुजन आघाडीच्या भुमिकेकडे ग्रामीण भागातील मतदारांचे लक्ष लागले आहे.भाजपाशी काडीमोड घेऊन शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या साथीने तथा महाविकास आघाडीच्या नावाने राज्यात सत्ता स्थापन केली. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक भाजपा स्वतंत्रपणे लढणार असल्याचे स्पष्ट झाले असून काँग्रेस, रा.काँ आणि शिवसेना हे तीन राजकीय पक्ष राज्यातील सत्ता स्थापनेसाठी अंगीकारलेल्या फॉर्म्युल्यानुसार एकत्र येऊन निवडणूक लढतात की त्यांच्याकडूनही स्वबळाचा नारा दिला जातो, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे लढणार की माजी मंत्री अनंतराव देशमुख यांच्या जनविकास आघाडीसोबत जाणार, हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या सर्व घडामोडींमध्ये जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गणांमध्ये विविध प्रमुख राजकीय पक्षांकडून निवडणूक लढविण्याची इच्छा बाळगून असलेल्या सच्चा कार्यकर्त्यांना उमेदवारी न मिळाल्यास नाराजांची मनधरणी करण्यातही प्रमुख पक्षांची कसोटी लागणार असल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषदElectionनिवडणूकPoliticsराजकारण