शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय खरेदी केंद्रांना प्रतिक्षा कापसाची 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 17:20 IST

वाशिम: जिल्ह्यात २० नोव्हेंबरपासून कारंजा आणि मानोरा येथे शासकीय कापूस खरेदीला प्रारंभ करण्यात आला तरी, गेल्या पाच दिवसांत अद्याप एक किलो कापसाची खरेदीही होऊ शकली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: जिल्ह्यात २० नोव्हेंबरपासून कारंजा आणि मानोरा येथे शासकीय कापूस खरेदीला प्रारंभ करण्यात आला तरी, गेल्या पाच दिवसांत अद्याप एक किलो कापसाची खरेदीही होऊ शकली नाही. व्यापाºयांकडून कपाशीला मिळणारे दर हमीभावापेक्षा तब्बल ५०० रुपयांनी अधिक असल्याने शेतकरी शासकीय केंद्रांकडे कापूस विकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे सध्या दिसत आहे. वाशिम जिल्ह्यात गतवर्षीप्रमाणेच यंदाही कपाशीवर बोंडअळीचा प्रादूर्भाव झाला आहे. त्याशिवाय लाल्या आणि इतर रोगांमुळे उत्पादनात प्रचंड घट आली आहे. यंदा जिल्ह्यात केवळ १८६०० हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी झाली होती. आता कपाशीची वेचणी अंतिम टप्प्यात असून, जिल्ह्यात व्यापाºयांनी कापूस खरेदीला महिनाभरापूर्वीच सुरुवात केली आहे. प्रामुख्याने कारंजा आणि मंगरुळपीर तालुक्यात कपाशीची खरेदी होत आहे. आता जिल्ह्यात कारंजा आणि मानोरा येथे २० नोव्हेंबर रोजी शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले; परंतु शुभारंभापासून गेल्या ५ दिवसांत या ठिकाणी कापसाचे बोंडही विक्रीसाठी आले नाही. शासनाने यंदा मध्यम लांबीचा धागा असलेल्या कपाशीसाठी प्रति क्विंटल ५१५०, तरे लांब धाग्याच्या कापसासाठी प्रति क्विंटल ५४५० रुपये हमीभाव जाहिर केले आहेत. या उलट व्यापाºयांकडे ५८०० ते ५९०० रुपये प्रति क्विंटल कापूस उत्पादकांना मिळत आहेत. त्यामुळे शासकीय खरेदी केंद्रांना यंदाही कापूस खरेदी करणे शक्य होणार नसल्याचे दिसत आहे.  दरम्यान, पणन महासंघ (फेडरेशन) कें द्रीय कापूस महामंडळाचे प्रतिनिधी म्हणून (सीसीआय) जिल्ह्यात कापूस खरेदी करीत असल्याचे पणन महासंघाचे मानोरा येथील शासकीय खरेदी केंद्राचे ग्रेडर एस. बी. जाजू यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमcottonकापूस