शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मंगळवारपासून शासकीय कर्मचारी तीन दिवसांच्या संपावर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 15:47 IST

वाशिम : शासनदरबारी प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शासकीय, निमशासकीय कर्मचारी ७ आॅगस्टपासून तीन दिवसांच्या संपावर जाणार आहेत.

ठळक मुद्दे ७, ८ व ९ आॅगस्ट २०१८ रोजी तीन दिवस राज्यव्यापी संपाचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला. यासंदर्भात शनिवारी जिल्हा प्रशासनाला निवेदन देत तीन दिवशीय संपासंदर्भात पूर्वसूचना दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शासनदरबारी प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शासकीय, निमशासकीय कर्मचारी ७ आॅगस्टपासून तीन दिवसांच्या संपावर जाणार आहेत. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ तसेच  महसूल कर्मचारी महासंघाने यासंदर्भात शनिवारी जिल्हा प्रशासनाला निवेदन देत तीन दिवशीय संपासंदर्भात पूर्वसूचना दिली.मागील दोन वर्षांपासून कर्मचाºयांच्या मागण्यांसदर्भात ठोस निर्णय घेण्यात आला नाही, असा आरोप करीत या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ७, ८ व ९ आॅगस्ट २०१८ रोजी तीन दिवस राज्यव्यापी संपाचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला. सातवा वेतन आयोग लागू करावा, अंशदायी पेंशन योजना रद्द करावी, पाच दिवसाचा आठवडा करावा, सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करण्यात यावे आदी मागण्या शासनस्तरावर वेळोवेळी करण्यात आल्या. मात्र, याकडे शासनाने अद्याप लक्ष दिले नसल्याने ७ ते ९ आॅगस्ट दरम्यान शासकीय, निमशासकीय कर्मचारी तीन दिवशीय संपावर जात आहेत. या संपात सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समिती, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना, महसूल कर्मचारी संघटना यासह विविध संघटना सहभागी होणार असल्याचा दावा कर्मचारी महासंघाने केला. जिल्हा परिषदेच्या विविध कर्मचारी संघटनेने शनिवारी मुख्य कार्यकारी अधिकाºयांना निवेदन देत ७ ते ९ आॅगस्ट दरम्यान संपावर जात असल्याची पूर्वसूचना दिली. यावेळी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे वाशिम जिल्हाध्यक्ष विजय धुमाळे, सचिव एच.जे. परिहार, महासंघाचे उपाध्यक्ष संतोष शिकार, स्वाती वानखेडे, सुरेश वानखेडे,  शाखा अभियंता दुरतकर, नाना तुर्के, अमोल कापसे, सुभाष काळे, डी. डी. राठोड, भागवत महाले, रामानंद ढंगारे, अनिल उल्हामाले, कांतप्रसाद तिवारी, संदीप चव्हाण, अविनाश पाठक, देवानंद धंतुरे, प्रवीण आरू, सचिन गटलेवार, राजू राऊत, सुनील मारुतकर, वाघमारे, शेलकर, एस.जे. गावंडे, दत्ता गायकवाड, इतर सर्व संघटनेचे प्रतिनिधी उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमEmployeeकर्मचारीWashim ZPवाशीम जिल्हा परिषद