शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील शासकीय कर्मचारी संपावर; प्रशासन ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 13:49 IST

मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या राज्यव्यापी संपात ७ आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी सहभागी झाल्याने प्रशासकीय कामकाम ठप्प पडले.

ठळक मुद्देकर्मचारी संपावर असल्याने महसूलविषयक कामकाज ठप्प पडले. जिल्हा परिषद व पंचायत समितीचे जवळपास २२०० ते २३०० कर्मचारी या संपात सहभागी झाल्याने कामकाज ठप्प पडले. परिचारिका या संपात सहभागी असल्याने आरोग्य सेवेवर काही प्रमाणात परिणाम जाणवला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - सातवा वेतन आयोग, महागाई भत्त्यासह विविध मागण्यांबाबत सरकारने कोणतेही ठोस आश्वासन दिलेले नाही, असा आरोप करीत मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या राज्यव्यापी संपात ७ आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी सहभागी झाल्याने प्रशासकीय कामकाम ठप्प पडले. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या आरोग्य कर्मचाºयांनी संपाला पाठिंबा म्हणून काळ्याफिती लावून कामकाज केल्याने ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सुरळीत सुरू असल्याचा दावा आरोग्य विभागाने केला.गत दोन वर्षांपासून कर्मचाºयांच्या मागण्यांसदर्भात ठोस निर्णय घेण्यात आला नाही. सातवा वेतन आयोग लागू करावा, अंशदायी पेंशन योजना रद्द करावी, पाच दिवसाचा आठवडा करावा, सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करण्यात यावे आदी मागण्या शासनस्तरावर वेळोवेळी करण्यात आल्या. मात्र, याकडे शासनाने अद्याप लक्ष दिले नाही. या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ७, ८ व ९ आॅगस्ट दरम्यान राज्यव्यापी संप पुकारण्यात आला. ७ आॅगस्ट रोजी या संपात जिल्ह्यातील महसूल विभागातील सर्वच अर्थात ३७८ कर्मचारी सहभागी झाल्याचा दावा महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विशाल डुकरे यांनी केला. कर्मचारी संपावर असल्याने महसूलविषयक कामकाज ठप्प पडले. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग रचना व आरक्षण सोडतीच्या कामकाजावरही या संपाचा परिणाम जाणवला.या संपात मंडळ अधिकारी व तलाठी सहभागी नाहीत, असे तलाठी, पटवारी, मंडळ अधिकारी समन्वय महासंघाचे राज्याध्यक्ष तथा वाशिमचे मंडळ अधिकारी श्याम जोशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. जिल्हा परिषद व पंचायत समितीचे जवळपास २२०० ते २३०० कर्मचारी या संपात सहभागी झाल्याने कामकाज ठप्प पडले. दोन शिक्षक संघटना संपात सहभागी असल्याने जिल्हा परिषदेच्या काही शाळा बंद तर काही शाळा सुरू होत्या. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्राच्या कर्मचाºयांनी या संपाला पाठिंबा म्हणून काळ्या फिती लावून कामकाज केल्याने ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सुरळीत सुरू आहे, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस.व्ही. मेहकरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच ग्रामीण रुग्णालयांतील परिचारिका या संपात सहभागी असल्याने आरोग्य सेवेवर काही प्रमाणात परिणाम जाणवला. जिल्हा सामान्य रुग्णालयातील परिचारिका वगळता अन्य कुणीही संपात सहभागी नसल्याने आरोग्य सेवा सुरळीत सुरू आहे, असा दावा वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल कावरखे यांनी केला. जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यालय, नगर परिषदेचे कर्मचारीही या संपात सहभागी असल्याने कार्यालयांत शुकशुकाट दिसत आहे.

टॅग्स :washimवाशिमEmployeeकर्मचारीStrikeसंप